(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
टेलिव्हिजनच्या क्षेत्रात सांस्कृतिक संदर्भ आणि मनोरंजन यांचे मिश्रण करणाऱ्या कल्पना सादर करण्यात स्टार प्लसने लक्षणीय भूमिका बजावली आहे. लोकांवर मोठा प्रभाव टाकणारी अशीच एक मालिका म्हणजे, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आहे. अनेक वर्षांनी ही मालिका टेलिव्हिजनवर परतली आहे आणि समकालीन सामाजिक समस्यांना संबोधित करून परिवर्तनास चालना देण्याचा वारसा सुरु ठेवला आहे. आता याचदरम्यान ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ चा नवीन प्रोमो रिलीज झाले आहे, ज्यामध्ये विचार-प्रवण अभियान #NotJustMoms सादर केला आहे. ही गोष्ट अधोरेखित करते की, मुलांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त आईची नसून ती आई-वडील दोघांची संयुक्त जबाबदारी आहे.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत तुळजा-जगदंबा आमनेसामने, देवीसमोर उलगडणार मत्सराचं रहस्य
हा प्रोमो भारतीय कुटुंबाच्या बदलत्या काळाशी सुसंगत अशी चर्चा छेडतो. आजच्या पिढीत जीवनाच्या सर्व पैलूंच्या बाबतीत पालकांची कर्तव्ये दोघे मिळून शेअर करताना दिसतात. पण मग मूल ही केवळ आईचीच जबाबदारी का समजली जाते? असे प्रश्न आणि दैनंदिन क्षण प्रोमोमध्ये दाखवले आहेत, जेथे मुलांना मूल्य आणि शिस्त शिकवण्याच्या अपेक्षेचे अनुचित ओझे मातांवर टाकले जाते आणि प्रोमोचे समापन एका स्पष्ट संदेशाने दिला आहे. मुलांचे पालन पोषण ही सामाईक जबाबदारी आहे. असे या प्रोमोमध्ये म्हटले आहे.
अलीकडेच योजलेल्या FICCI इव्हेंटमध्ये स्मृती इराणी आणि एकता कपूर यांनी एक दमदार #NotJustMoms प्रोमो सादर केला आणि मुलांच्या पालन-पोषणाबाबत एका भावनिक आणि विचार-प्रवण संवादाला चालना दिली. या वेळी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की, “आम्ही ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ टीम या विचाराला समर्थन देतो की लहान मुलांचे संगोपन करणे ही केवळ मातांची जबाबदारी नाही. मुलांच्या अपयशाचे बोल त्यांच्या आईला सुनावले जाते, पण मुलाचे यश आणि कीर्ती याबद्दल मात्र तिचे कौतुक होत नाही. त्यामुळे, जर मुलांच्या संगोपनाबाबतच्या समानतेविषयी बोलायचे झाले, तर हे अभियान हेच सांगते की, यासाठी केवळ आई दोषी ठरत नाही, ही तिच्या एकटीची जबाबदारी नाही.”
‘जिजाऊंपासून सिंधुताईंपर्यंत…’ झी मराठी अवॉर्ड्स २०२५ ने स्त्रीशक्तीला केला सलाम!
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या पूर्वी अत्यंत गाजलेल्या मालिकेत तुलसीची भूमिका करणारी स्मृती इराणी इतक्या वर्षांनी पुन्हा त्या भूमिकेत दिसत आहे. अशा या मालिकेत हा विचार मालिकेचा सांस्कृतिक प्रभाव अधोरेखित करतो आणि समान पालकत्वाचे महत्त्व ठासून सांगतो.
या विषयी बोलताना स्टार प्लसच्या प्रवक्त्याने सांगितले, “स्टार प्लसमध्ये आम्ही हे मानतो की कथांमध्ये परिवर्तनाला चालना देण्याचे बळ असते. #NotJustMoms अभियानासह, आम्ही या जुन्या विचाराला आव्हान देत आहोत की, लहान मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी फक्त आईची नसते. तुलसीला नव्या प्रकाशात सादर करून या संवादाला चालना देण्यासाठी आणि देशातील कुटुंबांना सामाईक पालकत्व स्वीकारण्यास प्रेरित करण्यासाठी ही मालिका तयार करण्यात आली आहे.”