(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठी अवॉर्ड्स २०२५ या खास अॅक्टमध्ये, भावना – छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. पारू – संत मुक्ताबाई, कमळी – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या रूपात, तर, तारिणी – राणी लक्ष्मीबाईंच्या रूपात आणि अनाथांची माय सिंधुताईं च्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सर्वांना एकत्र पाहण्याचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. मीरा आणि जान्हवी सावली जे सूत्रधाराच्या भूमिकेत असणार आहे. या दोघींची केमिस्ट्रीदेखील पाहायला मिळणार आहे.
साडे बारा हजार फूट उंचीवर ‘मना’चे श्लोक’चं झालं शूटिंग, चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
आपला अनुभव सांगताना कमळी म्हणजेच विजया बाबर म्हणाली “आमचं शूट साधारण रात्री २ वाजता सुरू झालं. हा अॅक्ट आम्ही समाजात मोठे योगदान देणाऱ्या महान स्त्रियांना वंदन म्हणून सादर करत आहोत. मी सावित्रीबाई फुले यांच्या रूपात सजले होते. त्या शक्तिशाली व्यक्तिमत्वांच्या रूपात सादरीकरण करत असताना, आम्हाला स्टेजवर एक वेगळीच उर्जा आणि स्त्रीशक्तीचा अनुभव आला. प्रत्येक सादरीकरणामागे एक संदेश आहे. हा संपूर्ण अॅक्ट त्या महान स्त्रियांच्या संघर्षकथा सांगणारा होता, ज्यांनी आपल्या जिद्दीने आणि धैर्याने समाजात अनेक बदल घडवले. त्यांच्या लढ्यामुळेच आपण स्त्रियां आज शिक्षण घेऊ शकतो, आपले अधिकार सांगू शकतो, स्वतंत्रपणे काम करू शकतो आणि आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. माझी प्राप्ती, शरयु, आणि अक्षया ताईंसोबत चांगली मैत्री झाली आणि आम्ही खूप एन्जॉय करत ऍक्ट शूट केला.”
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत तुळजा-जगदंबा आमनेसामने, देवीसमोर उलगडणार मत्सराचं रहस्य
या वर्षीचा झी मराठी पुरस्कार सोहळा केवळ मालिकांचा गौरव नसून, महाराष्ट्राच्या संस्कृती, इतिहास आणि स्त्रीशक्तीला अभिवादन करणारा कार्यक्रम ठरणार आहे. या प्रेरणादायी प्रवासाचा भाग प्रेक्षक होणार आहेत. ‘झी मराठी अवॉर्ड्स’ २०२५, ११ आणि १२ ऑक्टोबरला वाहिनीवर दिसणार आहे. तसेच या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात अनेक मोठं मोठ्या कलाकारांची हजेरी लागली.






