Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साऊथ स्टार विजय थलपथीची राजकारणात एन्ट्री, राजकीय पक्षाचा झेंडा आणि अँथम लाँच!

साऊथ स्टार विजय थलपथीने आता राजकारणात आपले पुढचे पाऊल टाकले आहे. याचदरम्यान अभिनेत्याने पक्षाच्या ध्वजाचे अनावरण करण्यापूर्वी राजकारणी विजय यांनी शपथ वाचून दाखवली. सर्व प्राणिमात्रांसाठी समानतेचे तत्व अभिनेता पाळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता अनेक चित्रपट सुपरहिट केल्यानंतर आता अभिनेता या राजकारणाचा भाग म्हणून चाहत्यांना दिसणार असून, चाहत्यांना या गोष्टीचा भरपूर आनंद झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 22, 2024 | 03:58 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सुप्रसिद्ध अभिनेते विजय यांनी आज, गुरुवारी आपल्या पक्षाच्या तमिलगा वेत्री कळघम (TVK) च्या ध्वजाचे आणि चिन्हाचे अधिकृतपणे अनावरण केले. टीव्हीके ध्वज आणि निवडणूक चिन्हाच्या अनावरणाच्या वेळी विजयचे वडील आणि आई देखील पक्ष कार्यालयात उपस्थित होते. 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विजयचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

यावेळी विजय म्हणाला की, “मला माहित आहे की तुम्ही सर्व आमच्या पहिल्या राज्य परिषदेची वाट पाहत आहात. त्यासाठी तयारी सुरू असून लवकरच मी त्याची घोषणा करेन. त्याआधी आज मी आपल्या पक्षाच्या ध्वजाचे अनावरण केले आहे. मला खूप अभिमान वाटतो आहे. तामिळनाडूच्या विकासासाठी आम्ही एकत्र काम करू.” असं अभिनेत्याने लोकांना सांगितले.

 

#WATCH | Chennai, Tamil Nadu: Actor and Tamilaga Vettri Kazhagam (TVK) chief Vijay unveils the party’s flag and symbol today. (Source: ANI/TVK) pic.twitter.com/J2nk2aRmsR — ANI (@ANI) August 22, 2024

पक्षाच्या ध्वजाचे अनावरण करण्यापूर्वी अभिनेते-राजकारणी विजय यांनी शपथ वाचून दाखवली. सर्व प्राणिमात्रांसाठी समानतेचे तत्व ते पाळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शपथपत्रात विजयने लिहिले की, ‘आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले आणि बलिदान दिले त्या सैनिकांचे मला नेहमीच कौतुक वाटेल. तमिळ भूमीतील आपल्या लोकांच्या हक्कांसाठी अथकपणे लढणाऱ्या त्या अगणित सैनिकांचे योगदान आम्ही सदैव लक्षात ठेवू. जात, धर्म, लिंग, जन्मस्थान या नावावरचा भेदभाव मी दूर करेल. मी लोकांमध्ये जागृती निर्माण करेल आणि सर्वांना समान संधी आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील. मी शपथ घेतो की मी सर्व प्राणिमात्रांसाठी समानतेचे तत्व कायम ठेवीन.’ अशी शपथ घेऊन विजयने लोकांना खुश करून टाकले.

याचदरम्यान बुधवारी, तामिळमध्ये जारी केलेल्या एका प्रेस स्टेटमेंटमध्ये, अभिनेत्याने सांगितले की लोकांसाठी काम करणे हा एक मोठा आशीर्वाद आहे. रोज नवी दिशा आणि नव्या ताकदीने काम करायचे असेल तर ते खूप मोठे योगदान आहे. 22 ऑगस्ट 2024 हा दिवस आहे जो देव आणि निसर्गाने आपल्याला आशीर्वाद म्हणून दिला आहे. याच दिवशी आम्ही तामिळनाडू विजय क्लबचे मुख्य प्रतीक असलेल्या ध्वजाची ओळख लोकांना करिन देत आहोत.” असं अभिनेत्याने सांगितले.

हे देखील वाचा- चाहतीने केला हेमा मालिनीला स्पर्श अभिनेत्रीने ढकलला हात, युजर्स म्हणाले “जया आणि ही एकसारखेच”

तामिळनाडूच्या कल्याणासाठी काम करताना आम्ही आमचा वीर ध्वज, विजय ध्वज आमच्या मुख्यालय सचिवालयात सादर करू, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच, ‘ते आपल्या राज्याचे प्रतीक बनेल. ध्वजगीतेही आम्ही प्रसिद्ध करू. त्याचा ध्वजही आम्ही फडकवू, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे.’ असं देखील विजय म्हणाला आहे. अभिनेता विजयने अलीकडेच राजकारणात प्रवेश केला असून या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याने आपल्या पक्षाचे नाव तमिलगा वेत्री कझगम ठेवले आहे.

Web Title: South star vijay thalapathys entry in politics political party flag and anthem launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 03:57 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.