
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गायक, अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर भाविन भानुशालीने दिशा चंद्रेजासोबत लग्न केले आहे. भाविनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. सेलिब्रिटी भाविन आणि दिशाला त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच त्यांच्या फोटोवर कंमेंट करून त्यांचे कौतुक करत आहेत.
‘आशा’चे प्रेरणादायी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, संघर्ष आणि जिद्दीची गर्जना करणारे गीत प्रदर्शित
त्यांचे लग्न कधी झाले?
अभिनेता आणि सोशल मीडिया पर्सनॅलिटी भाविन भानुशाली आणि दिशा चंद्रेजाचे लग्न २७ नोव्हेंबर २०२५ रोजी झाले आहे. भाविनने आज इन्स्टाग्रामवर लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत. भाविन आणि दिशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघांना चाहत्यांसह अनेक कलाकार शुभेच्छा देत आहेत. भाविनने काही काळापूर्वीच इन्स्टाग्रामवर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या सुंदर फोटोंमध्ये दिशा लाला लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. तर भाविन स्टायलिश पांढऱ्या शेरवानीमध्ये देखणा दिसत आहे. या फोटोंसोबत भाविनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तू मारी ने हूं तारो थाई गयो – २७.११.२५.”
सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा
अनेक सेलिब्रिटींनी भाविन भानुशाली आणि दिशा चंद्रेजाला त्यांच्या लग्नाबद्दल अभिनंदन केले आहे. विशाल जेठवा यांनी लिहिले, “भाविन भाई, नमन प्रणाम अभिनंदन,” रश्मी देसाई यांनी लिहिले, “तुम्हाला अभिनंदन,” अविका गोरने लिहिले, “अभिनंदन,” नील नितीन मुकेश यांनी लिहिले, “प्रिये, अभिनंदन,” हितेन तेजवानीने लिहिले, “अभिनंदन मित्रांनो… देव तुम्हाला आशीर्वाद देवो.”
ना छावा, ना सैयारा, ‘हा’ ठरला 2025 मधला ब्लॉकबस्टर चित्रपट, रिक्षाचालकाच्या कथेने केली कोटींची कमाई
भाविनने त्याचे वैयक्तिक आयुष्य ठेवले खाजगी
तसेच, भाविन साखरपुड्यानंतर त्याचे आयुष्य खूप खाजगी ठेवले आहे. आणि होणाऱ्या पत्नीचा चेहरा देखील चाहत्यांना दाखवला नाही. त्यामुळे, लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले की ही सुंदरी कोण आहे? आणि आता अखेर अभिनेत्याने लग्न केले करून होणाऱ्या बायकोचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे, आणि त्यांचे प्रश्न मिटवले आहेत.