Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govinda Ahuja : गोविंदाच्या हेअर पॅचपासून वैवाहिक आयुष्यापर्यंत; सुनीता आहुजांच्या वक्तव्यांची जोरदार चर्चा

सुनीता आहुजा यांनी एका मुलाखतीत गोविंदा सध्या हेअर पॅच वापरत असल्याचा खुलासा करत, यात लाज वाटण्यासारखे काही नसल्याचे म्हटले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 16, 2026 | 08:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीत सुनीता यांनी गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक स्पष्ट वक्तव्ये केली. त्यांनी सांगितले की, तरुणपणी गोविंदा अत्यंत देखणा दिसायचा आणि त्यावेळी त्याचे नैसर्गिक केस होते. आता मात्र तो हेअर पॅच वापरतो. यामध्ये लाज वाटण्यासारखे काही नसून चित्रपटसृष्टीतील अनेक पुरुष आणि महिला कलाकार अशा प्रकारच्या पद्धतींचा वापर करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रीतीच्या अटीमुळे दीप-ज्योतीसमोर नवं आव्हान; लग्नाच्या दृश्यांबाबत मानसी सुभाषचा खुलासा

सुनीता यांनी गोविंदाच्या अभिनय कौशल्याचेही भरभरून कौतुक केले. “माझा नवरा एकमेवाद्वितीय आहे. त्याच्यासारखा कलाकार इंडस्ट्रीत कधी झाला नाही आणि पुन्हा होणारही नाही,” असे त्या म्हणाल्या. मात्र, वैवाहिक आयुष्याबाबत बोलताना त्यांनी वेगळी भूमिका मांडली. त्यांच्या मते, गोविंदा एक उत्तम मुलगा आणि भाऊ आहे, पण पती म्हणून त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत.

त्यांनी सांगितले की, त्यांना फिरणे, पार्ट्या, सुट्ट्या आणि एकत्र वेळ घालवणे आवडते, परंतु गोविंदाने संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी काम करण्यात घालवले आणि स्वतःसाठी जगण्याची संधी घेतली नाही. “मला गोविंदासारखा मुलगा हवा होता, पती नव्हे,” असे वक्तव्य करत त्यांनी त्यांच्या वैवाहिक नात्यातील काही खंतही व्यक्त केली.

गेल्या काही महिन्यांत सुनीता यांनी गोविंदावर विवाहबाह्य संबंधांचेही आरोप केले होते. यावर नुकतीच प्रतिक्रिया देताना गोविंदाने हे सर्व एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा दावा केला. शांत राहिल्याने लोक चुकीचा अर्थ काढत असल्यामुळे आता बोलणे आवश्यक वाटल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आपल्या जवळच्या लोकांचाही नकळत गैरवापर केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिका पुन्हा झळकणार

1987 मध्ये विवाहबद्ध झालेल्या गोविंदा आणि सुनीता यांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत. टीना यापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण करून अभिनय केला असून, यशवर्धनदेखील लवकरच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. सुनीता यांच्या ताज्या वक्तव्यांमुळे या दाम्पत्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Sunita ahuja revealed about govindas hairpatch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Bollywood
  • Govinda

संबंधित बातम्या

Ayushmann Khurrana: बॉलिवूडमध्ये पुन्हा खळबळ! आयुष्मान खुराना रडारवर? लॉरेन्स गँगच्या नावाने धमकी, कोट्यवधींची खंडणी मागितली
1

Ayushmann Khurrana: बॉलिवूडमध्ये पुन्हा खळबळ! आयुष्मान खुराना रडारवर? लॉरेन्स गँगच्या नावाने धमकी, कोट्यवधींची खंडणी मागितली

Imran Khan: ‘अब आया ऊंट पहाड़ के नीचे’, भारतात राहायचं असेल तर राजकीय आंदोलन नको; इम्रान खानची कोर्टात माफी, नेमकं प्रकरण काय?
2

Imran Khan: ‘अब आया ऊंट पहाड़ के नीचे’, भारतात राहायचं असेल तर राजकीय आंदोलन नको; इम्रान खानची कोर्टात माफी, नेमकं प्रकरण काय?

Sanjay Gupta Passes Away: बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन
3

Sanjay Gupta Passes Away: बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.