(फोटो सौजन्य- social media)
सिनेविश्वातील दोन दिग्गज कलाकार जेव्हा मोठ्या पडद्यावर एकत्र येतात तेव्हा धमाका होणार हे नक्की. बी-टाऊनचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. रजनीकांतने ३० वर्षांपूर्वी आमिर खानसोबत आतंक ही आतंकमध्ये काम केले होते. दिलीप शंकर दिग्दर्शित या चित्रपटात जुही चावला, अर्चना जोगळेकर आणि पूजा बेदी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. आता तब्बल ३० वर्षानंतर हे दोघेही चाहत्यांना एकत्र काम करताना दिसणार आहे. तसेच ही बातमी चाहत्यांसाठी खूप आनंदाची ठरली आहे.
रजनीकांतसोबत आमिर खान झळकणार
रजनीकांत आणि आमिर खान 30 वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करणार आहेत. इंडिया ब्लिट्जच्या मते, आमिर खान रजनीकांत स्टारर सिनेमा ‘कुली’मध्ये कॅमिओ करू शकतो. तो रजनीकांतसोबत पडद्यावर आग लावणार असून तो ॲक्शन अवतारात दिसणार आहे. हा चित्रपट लिओ दिग्दर्शक लोकेश कनागराज दिग्दर्शित करत आहेत. या ॲक्शन थ्रिलरबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आमिर खानच्या कॅमिओची बातमीने त्याच्या चाहत्यांना खूश केले आहे. तथापि, आमिरच्या कॅमिओची अद्याप निर्मात्यांनी किंवा अभिनेत्यांनी पुष्टी केलेली नाही. जर हे खरे असेल तर त्याच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमी ठरू शकते.
रजनीकांतचे आगामी चित्रपट
जेलरच्या यशानंतर, रजनीकांत लाल सलाम या चित्रपटामधून प्रेक्षकांना दिसला होता, ज्याचे दिग्दर्शन त्यांची मुलगी ऐश्वर्याने केले होते. कुली या आगामी चित्रपटाव्यतिरिक्त तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत वेट्टय़ान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टी.जे. ज्ञानवेल केले आहे. असे नवनवीन प्रोजेट्स घेऊन अभिनेता लवकरच चाहत्यांच्या समोर येणार आहे.
हे देखील वाचा- Stree 2 च्या यशानंतर अभिनेत्री बदलणार घर, श्रद्धा कपूर बनणार अक्षय कुमारची शेजारी?
आमिर खानचा आगामी चित्रपट
आमिर खान लाल सिंग चड्ढा या चित्रपटात शेवटचा दिसला होता. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’ मोठ्या पडद्यावर लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. तो सनी देओल आणि प्रिती झिंटा स्टारर ‘लाहोर 1947’ ची निर्मितीही करत आहे.