Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shahrukh Khan : शाहरुख खानला दिलासा! मन्नत वाढणार? न्यायालयाने नूतनीकरणाविरोधात ‘त्या’ याचिका फेटाळल्या

सुप्रीम कोर्टाने शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याच्या नूतनीकरणाविरोधातील याचिका फेटाळत, कायद्याच्या चौकटीत घराचे नूतनीकरण करण्याचा अधिकार घरमालकांना असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी NGT नेही पर्यावरणीय आणि CRZ मंजुरीविरोधातील अपील नामंजूर केल्याने 'मन्नत'च्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 14, 2026 | 08:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मुंबईतील प्रसिद्ध ‘मन्नत’ बंगल्याच्या नूतनीकरणाला अखेर सुप्रीम कोर्टाची मंजुरी मिळाली आहे. या नूतनीकरणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत, घरमालकांना कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या मालमत्तेत बदल करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. याचिकाकर्त्याने ‘मन्नत’ बंगल्याच्या विस्तारासाठी आवश्यक पर्यावरणीय मंजुरी आणि इतर वैधानिक नियमांचे पालन झाले नसल्याचा दावा केला होता. तसेच पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांसाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC) यांची मंजुरी बंधनकारक असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले होते.

Omi Vaidya on Sonam Wangchuk : ‘… ला मरताना पाहायचं नाहीये’ 3 Idiots सिनेमातल्या मराठमोळ्या अभिनेत्याची भावूक साद!

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ‘मन्नत’ हे खासगी निवासस्थान असल्याचे सांगत, कायद्याचे पालन केल्यास त्याच्या नूतनीकरणावर कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच हे प्रकरण पुन्हा राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) पाठवण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली.

यापूर्वी NGT नेही ‘मन्नत’ बंगल्याच्या विस्तारासाठी देण्यात आलेल्या CRZ आणि पर्यावरणीय मंजुरीविरोधातील अपील नामंजूर केले होते. प्रकल्पासाठी आवश्यक सर्व परवानग्या नियमानुसार मिळाल्याचे लवादाने स्पष्ट केले होते. दरम्यान, गौरी खान यांनी ‘मन्नत’च्या सहा मजली अॅनेक्स इमारतीवर आणखी दोन मजले उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावामुळे पर्यावरणीय मंजुरीवरून वाद निर्माण झाला होता. मात्र, NGT आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानेही याचिका फेटाळल्याने आता ‘मन्नत’च्या विस्ताराचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे.

शाहरुख खानने खरेदी केली आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट! येथूनच सुरु झाला होता किंग खानचा प्रवास

दिल्ली येथे खरेदी केली वास्तू!

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने दिल्लीतील पंचशील पार्क येथील आपल्या बालपणाच्या आठवणींशी जोडलेली मालमत्ता पुन्हा खरेदी केली आहे. सुमारे ३७ कोटी रुपयांना त्याने इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला विकत घेतला असून, यापूर्वी तळमजला आणि पहिला मजला त्याच्या मालकीचा होता. त्यामुळे आता संपूर्ण इमारतीची मालकी शाहरुखकडे आली आहे. याच घरात त्याचे बालपण गेले होते आणि गौरी खानसोबत लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवसही त्याने येथेच घालवले होते. अनेक वर्षांनंतर हे घर पुन्हा मिळाल्याने शाहरुखने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Web Title: Supreme court dismisses petition challenging of mannat renovation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • shahrukh khan

संबंधित बातम्या

शाहरुख खानने खरेदी केली आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट! येथूनच सुरु झाला होता किंग खानचा प्रवास
1

शाहरुख खानने खरेदी केली आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट! येथूनच सुरु झाला होता किंग खानचा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.