फोटो सौजन्य - Social Media
Deool Band 2 तर देवाच्या नावावरून चालला! ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडेने दिले सडेतोड उत्तर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखने दक्षिण दिल्लीतील पॉश परिसर पंचशील पार्क येथील इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला सुमारे ३७ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. यापूर्वी या इमारतीचा तळमजला आणि पहिला मजला त्याच्या मालकीचा होता. आता उर्वरित मजलेही विकत घेतल्याने संपूर्ण इमारतीची मालकी शाहरुखकडे आली आहे.
सुमारे १०,८०० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या मालमत्तेची प्रति चौरस फूट किंमत अंदाजे ३४,२६० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पंचशील पार्क हा दिल्लीतील सर्वात प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू परिसरांपैकी एक मानला जातो.
हे घर शाहरुख खानच्या आयुष्यात विशेष स्थान राखून आहे. याच घरात त्याचे बालपण गेले आणि १९९१ मध्ये गौरी खानसोबत विवाह केल्यानंतर काही काळ दोघेही याच घरात वास्तव्यास होते. अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी मुंबईत जाण्यापूर्वी त्याने आयुष्यातील अनेक सुंदर क्षण याच घरात अनुभवले. अनेक वर्षांनंतर आपल्या जुन्या घराची पुन्हा मालकी मिळाल्याने शाहरुख खानसाठी हा व्यवहार भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्येही या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून, जुन्या आठवणींना त्याने पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.






