Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karuppu चा टीझर पाहून चाहत्यांना आली ‘गजनी’ची आठवण, अभिनेता सूर्या दिसला ॲक्शन मोडमध्ये

साऊथ सुपरस्टार सूर्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नवीन चित्रपट 'करुप्पू'चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांना 'गजनी' चित्रपटाची आठवण आली.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 23, 2025 | 04:12 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सूर्याच्या चाहत्यांना त्याच्या ५० व्या वाढदिवशी एक खास भेट मिळाली आहे. अभिनेत्याच्या बहुप्रतिक्षित ‘करुप्पू’ चित्रपटाचा टीझर बुधवारी प्रदर्शित झाला, जो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. सूर्या पुन्हा एकदा चित्रपटात ॲक्शन अवतारात दिसणार आहे. तसेच त्याला पुन्हा एकदा नव्या पात्रात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

सूर्या एका शक्तिशाली डबल लूकमध्ये दिसणार
टीझरची सुरुवात एका जड आवाजाने होते, ज्यामध्ये एका स्थानिक देवतेबद्दल सांगितले आहे, ज्याची पूजा लाल मिरच्यांनी केली जाते. या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर, सूर्याची दुहेरी भूमिका समोर येते. एकीकडे, वकिलाच्या गणवेशात कोर्टात त्याचा गंभीर लूक आणि दुसरीकडे, त्याचा ग्रामीण देसी लूक, ज्यामध्ये तो हातात कोयता धरलेला दिसतो आहे. या दोन्ही पात्रांमध्ये एक मनोरंजक रहस्य देखील लपलेले आहे, जे चित्रपटाची कथा आणखी मनोरंजक बनवू शकते.

Atheist Krishna यांचे निधन; रूपाली गांगुलीने व्यक्त केले दुःख, पंतप्रधान मोदी आणि अक्षयने केले होते कौतुक

‘गजनी’चा सीन पुन्हा एकदा पडद्यावर
२००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गजनी’मधील प्रसिद्ध टरबूज खाण्याचा सीन या टीझरमध्ये पुन्हा एकदा दाखवण्यात आला आहे. सूर्यासाठी हा सीन खूप खास आहे. करुप्पूचा हा टीझर स्पष्टपणे दर्शवितो की हा चित्रपट केवळ अ‍ॅक्शनने भरलेला नाही तर भावना आणि शक्तिशाली संवादांनीही भरलेला असेल. अभिनेत्याची नवी भूमिका या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

 

टीझरमध्ये दिसला जबरदस्त अ‍ॅक्शन मोड
टीझरमध्ये दाखवलेले अ‍ॅक्शन सीन्सही खूप जबरदस्त दिसत आहेत. पारंपारिक तमिळ सेटअप, लोकेशन्स आणि लोक धार्मिक घटक चित्रपटाची कथा अधिक रंजक बनवत आहेत. या टीझरवरून चाहत्यांना आता ‘पुष्पा’ किंवा ‘कंचना’ सारखा ब्लॉकबस्टर परफॉर्मन्स पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. सूर्या पुन्हा एकदा चाहत्यांसाठी काहीतरी खास घेऊन येणार आहे, जे पाहण्यासाठी ते आतुर आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशीच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट
‘करुप्पू’ चित्रपटाचे दिग्दर्शन आरजे बालाजी यांनी केले आहे आणि त्याची कथा अश्विन रविचंद्रन, राहुल राज, टीएस गोपी कृष्णन आणि करण अरविंद कुमार यांनी लिहिली आहे. ड्रीम वॉरियर पिक्चर्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. सूर्यासोबत या चित्रपटात त्रिशा, योगी बाबू, स्वसिका, इंद्रांस, शिवदा, नट्टी सुब्रमण्यम आणि सुप्रीत रेड्डी हे कलाकार देखील दिसणार आहेत.

Web Title: Suriya karuppu teaser release action packed return fans excited on his birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Family Man Season 3 मध्ये मनोज बाजपेयींची बंपर कमाई ! फी एवढी की दुबईतही आलिशान घर मिळेल
1

Family Man Season 3 मध्ये मनोज बाजपेयींची बंपर कमाई ! फी एवढी की दुबईतही आलिशान घर मिळेल

माधुरी दीक्षितची ‘मिसेस देशपांडे’ सिरीजची OTT रिलीज डेट कन्फर्म, जाणून घ्या कुठे आणि कुठे होणार प्रदर्शित
2

माधुरी दीक्षितची ‘मिसेस देशपांडे’ सिरीजची OTT रिलीज डेट कन्फर्म, जाणून घ्या कुठे आणि कुठे होणार प्रदर्शित

Miss Universe 2025: वादानंतरही जिंकली, जिला सर्वांसमोर ‘मूर्ख’ म्हटले तिच ठरली Miss Universe 2025ची विजेती, फातिमा बॉश कोण आहे?
3

Miss Universe 2025: वादानंतरही जिंकली, जिला सर्वांसमोर ‘मूर्ख’ म्हटले तिच ठरली Miss Universe 2025ची विजेती, फातिमा बॉश कोण आहे?

‘असंभव 80s‘च्या ट्रेंडची कलाकारांना भुरळ! सचित पाटीलच्या चित्रपटाने वाढवली उत्सुकता
4

‘असंभव 80s‘च्या ट्रेंडची कलाकारांना भुरळ! सचित पाटीलच्या चित्रपटाने वाढवली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.