
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. आज पाच वर्षांनंतरही सुशांतचे चाहते आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना भावपूर्ण आठवणीत ठेवतात. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता.
त्या वेळी झालेल्या तपासात असे निष्पन्न झाले होते की सुशांतने आत्महत्या केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा सुशांतच्या मृत्यूचा विषय चर्चेत आला आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ति हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.
श्वेताच्या म्हणण्यानुसार, सुशांतने आत्महत्या केली नव्हती, तर त्याचा खून करण्यात आला होता. तिने सांगितले की, “दोन लोक सुशांतचा मर्डर करण्यासाठी आले होते..” अशा शब्दांत तिने तिच्या भावाच्या मृत्यूबद्दल नवी शंका उपस्थित केली आहे.
श्वेता सिंह कीर्तिने तिच्या भावाच्या दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक दावे केले आहेत.श्वेता सिंह म्हणाली, “आत्महत्या होच शकत नाही. कारण सुशांतच्या बेड आणि पंख्याच्या दरम्यान इतकं अंतरच नव्हतं की कोणी त्यावर लटकून आत्महत्या करू शकेल. जर आत्महत्या करायचीच असती, तर स्टूल किंवा टेबलचा वापर झाला असता, पण तिथे असं काही सापडलंच नाही.”
अखेर प्रेक्षकांची संपली प्रतीक्षा, नागिनची दिसली पहिली झलक; जाणून घ्या मालिका कधी होणार रिलीज
ती पुढे म्हणाली, “सुशांतच्या मानेवर खून होती, ती कपड्याची नव्हती, तर जणू एखाद्या पातळ चैनसारख्या वस्तूने दाबल्यासारखे वाटत होते.” श्वेताच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सुशांतच्या मृत्यूमागचं रहस्य चर्चेत आलं आहे. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर या खुलाशानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
श्वेता सिंह कीर्तिने पुढे बोलताना आणखी एक धक्कादायक खुलासा केला. ती म्हणाली, “भाऊच्या मृत्यूनंतर मी दोन मानसशास्त्रज्ञांना (सायकॉलॉजिस्ट) भेटले. एक अमेरिका येथील होते आणि दुसरे मुंबईचे. दोघांनीही मला सांगितले की सुशांतचा खून झाला आहे.”
श्वेता पुढे म्हणाली,”अमेरिकन सायकॉलॉजिस्टला माझ्याबद्दल किंवा सुशांतबद्दल काहीच माहिती नव्हतं. तरीदेखील त्यांनी मला स्वतःहून संपर्क केला आणि स्पष्ट सांगितले की, ‘त्याचा मर्डर झाला आहे, दोन लोक आले होते.तर मुंबईतील सायकॉलॉजिस्टनेही हेच सांगितले की सुशांतचा खून झाला होता. दोघांचंही एकमत होतं दोन लोकांनी मिळून सुशांतचा खून केला आहे.”