(फोटो सौजन्य - x अकाउंट)
तमिळ चित्रपटांचा सुपरस्टार विशाल कृष्णा रेड्डी लवकरच त्याच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. अभिनेता आता लवकरच लग्न करणार आहे. गेल्या काही काळापासून गॉसिप कॉरिडॉरमध्ये त्याच्या लग्नाच्या चर्चांना वेग आला होता. आता विशालने स्वतः या अफवांना अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. आगामी चित्रपट ‘योगी दा’ च्या ऑडिओ आणि ट्रेलर लाँच कार्यक्रमात, सुपरस्टारने पुष्टी केली की तो अभिनेत्री सई धनशिकासोबत लग्न करणार आहे. एवढेच नाही तर दोघांनीही त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित केली आहे, ज्याची माहिती त्यांनी कार्यक्रमादरम्यान दिली. ही बातमी ऐकून चाहत्यांना आनंद झाला आहे.
विशालची प्रेयसी Sai Dhanshika आहे कोण?
सुपरस्टार विशालची प्रेयसी सई धनशिका बद्दल बोलायचे झाले तर, ती एक प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री आहे. 20 नोव्हेंबर 1989 रोजी तमिळनाडूच्या तंजावर येथे जन्मलेल्या धनशिकाने 2006 मध्ये ‘मनाथोडु मझाईकलम’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिने मरीनाची भूमिका साकारली होती. पदार्पणानंतर सई धनशिकाने ‘पेरणमाई’, ‘मांजा वेळू’ आणि ‘निल गवाणी सेल्लाथे’ असे अनेक चित्रपट केले. एवढेच नाही तर तिने ‘कबाली’ चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत यांच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारली आहे.
Tamil actors #Vishal & #SaiDhanshika confirmed their relationship & announced their wedding date as August 29, during the trailer launch event for Sai’s film #Yogida on May 19. pic.twitter.com/QqaERrSU76
— OTTRelease (@ott_release) May 19, 2025
तिने स्वतःच्या नावावर जिंकला फिल्मफेअर पुरस्कार
तिच्या कारकिर्दीत, सई धनशिकाने पडद्यावर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली आहे. तमिळ व्यतिरिक्त, तिला मल्याळम चित्रपटांमध्येही ओळख मिळाली आहे. सई दुलकर सलमानसोबत एका सोलो चित्रपटात दिसली आहे. याशिवाय ती ‘शिकारू’ या तेलुगू चित्रपटातही दिसली आहे. धनशिकाला तिच्या कामासाठी दोनदा साउथ फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले आहेत. ही अभिनेत्री तिच्या आगामी ‘योगी दा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
एकेकाळी ९४ किलो वजन ज्युनियर NTR ला विद्रुप म्हटले जायचे, पण राजामौलीने आयुष्य बदललं
विशाल आणि धनशिका कधी लग्न करणार?
ट्रेलर लाँच इव्हेंट दरम्यान सुपरस्टार विशालने त्याच्या लग्नाची तारीखही सांगितली. २९ ऑगस्ट रोजी त्याच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी तो साई धनशिकासोबत सात फेरे घेणार असल्याचे त्याने सांगितले आहे. विशाल २९ ऑगस्ट रोजी वाढदिवशी ४८ वर्षांचा होणार आहे. तर सई धनशिका ३५ वर्षांची आहे. दोघांमधील वयाचे अंतर १२ वर्षांपेक्षा जास्त आहे. तथापि, वय बाजूला ठेवून, हे जोडपे एकमेकांसोबत आयुष्य घालवण्यास तयार आहे. या दोघांच्याही चाहत्यांना याना एकत्र पाहून खूप आनंद झाला आहे.