(फोटो सौजन्य - अकाउंट)
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच, त्याचा आणि ब्रिटिश गायिका जास्मिन वालियाचा एक जुना सुट्टीतील व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हार्दिकच्या २०२४ मध्ये झालेल्या श्रीलंका दौऱ्यातील असल्याचे म्हटले जात आहे, ज्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. आयपीएलपूर्वीच हार्दिकच्या या व्हिडिओनंतर चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच चाहते या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देत आहे.
सत्य आणि अन्यायाच्या संघर्षात कोण जिंकेल? ‘राख’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…
जास्मिन-हार्दिक पंड्याच्या अफेअरबद्दल चर्चा
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविचच्या घटस्फोटापासून सोशल मीडियावर अनेक अटकळ बांधली जात होती. या घटस्फोटासाठी लोक नताशाला दोष देऊ लागले असताना, आता जास्मिन वालिया आणि हार्दिक पंड्या यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नवीन अफवांना वेग आला आहे. तसेच आता हा व्हिडीओ पाहून चाहते चकित झाले आहेत. प्रसिद्ध ब्रिटिश गायिका जास्मिन वालिया याआधीही तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आल्या होत्या ज्यामध्ये तिने एका रहस्यमय व्यक्तीचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये दिसणाऱ्या हातावरील टॅटूची तुलना हार्दिकच्या टॅटूशी करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा आणखी तीव्र झाल्या.
श्रीलंका दौऱ्यातील व्हायरल व्हिडिओ
या व्हायरल व्हिडिओमध्ये, जास्मिन वालिया पांढऱ्या उन्हाळी ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने लाल स्लिंग बॅग आणि पांढऱ्या स्लायडर्ससह अॅक्सेसरीज परिधान केले होते, ज्यामुळे तिच्या लूकमध्ये आणखी भर पडली. तिच्या लेसर-कट हेअरस्टाईलने तिचा स्टायलिश लूक पूर्ण केला. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, जास्मिन कॅबमधून उतरताच हार्दिक पांड्याही तिथे दिसतो. यावेळी हार्दिक गोल काउबॉय हॅट, पांढरा स्लीव्हलेस टी-शर्ट आणि ट्रॅक पँटमध्ये दिसत आहे.
The Diplomat बॉक्स ऑफिसवर मंदगतीत, पाचव्या दिवशी चित्रपटाची झाली एवढीच कमाई!
चाहत्यांमध्ये वाढला सस्पेन्स
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हार्दिक पंड्याचे चाहते त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याला फक्त योगायोग मानत आहेत, तर काही जण म्हणत आहेत की हार्दिक आणि जास्मिन प्रत्यक्षात एकमेकांना डेट करत आहेत. या प्रकरणात हार्दिक किंवा जास्मिनकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. तथापि, हार्दिकचे सामने पाहण्यासाठी जस्मिनला अनेक वेळा स्टेडियममध्ये पाहिले गेले आहे, ज्यामुळे अटकळांना आणखी बळकटी मिळाली आहे.