(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जॉन अब्राहमचा ‘द डिप्लोमॅट’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत. जरी हा चित्रपट गेल्या पाच दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर आपली उपस्थिती दाखवत असला तरी, तो अपेक्षेइतका कमाई करत नाहीये. ‘द डिप्लोमॅट’ तिकीट खिडकीवर वाईट कामगिरी करत आहे आणि चित्रपटाने अजून २० कोटींचा टप्पाही ओलांडलेला नाही. या चित्रपटाचा पाचव्या दिवसाचा कलेक्शन किती झाले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
‘द डिप्लोमॅट’ चित्रपटाची कमाई
Sacnilk.com च्या ताज्या आकडेवारीनुसार, जॉन अब्राहमचा ‘द डिप्लोमॅट’ चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी फक्त १.२५ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तथापि, हे या चित्रपटाचे प्रारंभिक आणि अंदाजे आकडे आहेत. यासह, या चित्रपटाची एकूण कमाई १६.०५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची अपेक्षा होती पण त्याच्या कमाईत कोणतीही वाढ झालेली दिसत नाही आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या चार दिवसांत चित्रपटाची कमाई
याचदरम्यान, जर आपण गेल्या चार दिवसांत चित्रपटाच्या कमाईवर नजर टाकली तर, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चार कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्याच वेळी, चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवारी ४.६५ कोटी रुपये कमावले होते. यासह, चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी ४.६५ कोटी रुपये कमावले आणि चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी चित्रपटाच्या खात्यात फक्त १.५ कोटी रुपये जमा झाले आहे. चित्रपटाची सुरुवात चांगली झाली असली तरी आता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे.
दुबई ट्रीप आणि फॅमिली टाईम! अभिनेत्री अमृता खानविलकरच्या दुबई प्रवासाची पहा exclusive झलक
काय आहे चित्रपटाची कथा
यासोबतच, जर आपण या चित्रपटाच्या कथेबद्दल बोललो तर ‘द डिप्लोमॅट’ हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. जेपी सिंग हे एक भारतीय राजदूत आहेत जे पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासात काम करतात. चित्रपटात अचानक एक महिला या दूतावासात प्रवेश करते आणि स्वतःची ओळख भारतीय म्हणून करून देते. ती तिथल्या लोकांना त्यांना परत पाठवण्यासाठी मदत करण्याची विनंती करते. हे सगळं या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.