Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thama Teaser: ‘थामा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांना भयपटासह प्रेमकथेची मिळणार झलक

दिनेश विजनचा पुढचा चित्रपट 'थामा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर आज मंगळवारी प्रदर्शित झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 19, 2025 | 12:30 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘थामा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
  • भयपटासह प्रेमकथेची मिळणार झलक
  • कसा आहे ‘थामा’ चित्रपटाचा टीझर?
मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर युनिव्हर्समधील ‘स्त्री’ आणि ‘स्त्री २’ हे चित्रपट प्रचंड हिट झाले आहेत. आता या युनिव्हर्सचा पुढचा चित्रपट येत आहे, ज्याचे नाव ‘थामा’ आहे. यामध्ये आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटातील दोघांचेही फर्स्ट लूक आधीच समोर आले आहेत. आज त्याचा टीझर देखील रिलीज झाला आहे. टीझर पाहून चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत.

Manika Vishwakarma: मनिका विश्वकर्मा बनली २०२५ ची मिस युनिव्हर्स इंडिया, जागतिक मंचावर करणार भारताचे प्रतिनिधित्व

‘थामा’ ही मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडी विश्वातील पहिली प्रेमकथा
‘थामा’ चित्रपटाचा टीझर मॅडॉक फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवरून प्रदर्शित झाला आहे. ‘थामा’ हा दिनेश विजनच्या मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी विश्वातील पहिला प्रेमकथा चित्रपट आहे. टीझरच्या सुरुवातीला आयुष्मान खुराना आणि रश्मिका जंगलात दाखवले आहेत. ‘तू माझ्याशिवाय जगू शकशील का? १०० वर्षे’ असा प्रश्न ऐकू येतो. उत्तर येते, ‘१०० वर्षांसाठी काय, एका क्षणासाठीही नाही विसरणार’.

 

प्रेमकथेसोबत रक्तरंजित खेळ देखील दिसणार
यानंतर, प्रत्येक प्रेमकथेत घडते तसे, टीझरमध्ये रश्मिका-आयुष्मानच्या प्रेमकथेमध्ये काही अडचणी येतात, ज्यामध्ये भयपट देखील समाविष्ट आहे. आयुष्मान जंगलात प्राण्यांशी लढतो. या चित्रपटामध्ये एक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. पण त्यात रक्तपात देखील आहे. आदित्य सरपोतदार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे. मॅडॉक फिल्म्सने एक इन्स्टाग्राम पोस्ट देखील शेअर केली आहे आणि टीझरबद्दल माहिती दिली आहे. त्यासोबत लिहिले आहे, ‘भीती कधीच इतकी शक्तिशाली नव्हती आणि प्रेम कधीच इतकी रक्तरंजित नव्हते’.

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी

‘पंचायत’ मधील प्रल्हादचा आणि मलायकाचा आयटम नंबर
‘थामा’ चित्रपटाचा टीझर सुमारे १ मिनिट ४९ सेकंदांचा आहे. हा टीझर खूपच जबरदस्त आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये मलायका अरोराच्या नृत्याची झलक देखील आहे, म्हणजेच प्रेक्षकांना चित्रपटात तिचा आयटम नंबर पाहायला मिळेल. याशिवाय ‘पंचायत’ मालिकेतील प्रल्हाद चा म्हणजेच अभिनेता फैसल मलिक देखील आहे. याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल सारखे स्टार देखील ‘थामा’मध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Web Title: Thama teaser ayushmann khurrana rashmika mandanna nawazuddin siddiqui paresh rawal dinesh vijan maddock films

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • rashmika mandanna

संबंधित बातम्या

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
1

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
2

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
3

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!
4

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.