(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मनिका विश्वकर्माचे अखेर पाहिलेलं स्वप्न पूर्ण झाले आहे. ती २०२५ मधील मिस युनिव्हर्स इंडिया बनली आहे. या वर्षाच्या अखेरीस, ती थायलंडमध्ये होणाऱ्या ७४ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या सौंदर्य स्पर्धेने मनिका विश्वकर्माचे आयुष्य बदलून टाकले आहे, ज्यामुळे तिला अधिक आत्मविश्वास मिळाला आहे. तसेच तिचे आता जगभर कौतुक देखील होत आहे. सोशल मीडियावर तिच्याच नावाची चर्चा होत आहे.
मनिका विश्वकर्माने मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ चा किताब जिंकला
राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात मनिका विश्वकर्माला मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ चा किताब देण्यात आला. या भव्य कार्यक्रमात मिस युनिव्हर्स इंडिया २०२४ रिया सिंघा यांनी तिच्या उत्तराधिकारीला मुकुट घातला. ज्युरी सदस्यांमध्ये मिस युनिव्हर्स इंडियाचे मालक निखिल आनंद, बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, प्रसिद्ध बॉलीवूड स्टायलिस्ट एस्ले रोबेलो, बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक फरहाद सामजी यांसारखी लोकप्रिय नावे उपस्थित होती.
#WATCH | Jaipur, Rajasthan: Manika Vishwakarma gets crowned as Miss Universe India 2025. She will represent India at the 74th Miss Universe pageant in Thailand later this year. pic.twitter.com/8EqmzFP2Of
— ANI (@ANI) August 18, 2025
जिंकल्यानंतर मनिका विश्वकर्मा काय म्हणाली
मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ चा किताब जिंकल्यानंतर मनिका विश्वकर्मा खूप खुश झाली आणि म्हणाली, ‘माझा प्रवास गंगानगर शहरातून सुरू झाला. मी दिल्लीला आली आणि या सौंदर्य स्पर्धेची तयारी केली. ज्यांनी मला मदत केली आणि मला या टप्प्यावर आणले त्या सर्वांचे मी आभार मानते. ही सौंदर्य स्पर्धा एक खास जग आहे, येथे आपण एक वेगळे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करतो. ही जबाबदारी माझ्याकडे एका वर्षासाठी नाही तर आयुष्यभर राहील.’ असे म्हणून तिने सगळ्यांचे आभार मानले.
ज्युरी सदस्य उर्वशी रौतेलाने आनंद केला व्यक्त
अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ च्या ज्युरी सदस्य म्हणून कार्यक्रमात उपस्थित होती. मनिका विश्वकर्माच्या विजयाने ती आनंदी झाली. उर्वशी म्हणाली, ‘स्पर्धा खूप कठीण होती, पण विजेता आमच्यासोबत आहे. मनिका विजेती ठरली याचा आम्हाला खूप आनंद आहे. आता ती आम्हाला मिस युनिव्हर्समध्ये अभिमान बाळगण्याची संधी नक्कीच देईल.’ असे अभिनेत्रीने म्हटले आणि मनिकचे कौतुक केले.