(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या थामा चित्रपटाबद्दल सद्या बरीच चर्चा आहे. थामा या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला असून, यामधून दिनेश विजनच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सच्या पाचव्या भागाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. थामा या चित्रपटाच्या ट्रेलरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या चित्रपटात आयुषमान खुराना, रश्मिका मंधाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहेत.या ट्रेलरची सुरूवात नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दमदार डायलॉगने होते, नंतर त्यात आयुषमान खुराणाची धमाकेदार एंट्री दाखवली आहे. “मुंज्या” फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या या आगामी चित्रपटात खुरानासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा शुक्रवारी मुंबईत पार पडला आणि खुरानाने त्यात हजेरी लावली.
आयुषमान खुराणा आणि रश्मिका मंदानाचा ‘थामा’ चित्रपट २१ ऑक्टोबर, २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. याव्यतिरिक्त, तुम्हाला या चित्रपटात ‘भेड़िया’ आणि ‘स्त्री’ ची झलकही पाहायला मिळेल. आता ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक वाढली आहे.
‘आई ती आईच!’ राणी मुखर्जीने लेकीचा हट्ट राष्ट्रीय पुरस्काराच्या मंचावरही केला पूर्ण…
या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. एका युजरने लिहिलं, “वरुण धवनचा ‘भेड़िया’ म्हणून आणि श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ म्हणून कॅमियो येणार, म्हणून खूपच उत्सुक आहे…थामा ब्लॉकबस्टर होणार हे नक्की!”
दुसऱ्याने कमेंट केलं, “मुंज्याचं कनेक्शन दाखवलं आणि भेड़िया च्या VFX वरसुद्धा खूप चांगलं काम झालंय… थँक्स!”अश्या अनेक कमेंट्स चाहत्यांच्या पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं आहे.
Bigg Boss 19 : अभिषेक बजाजनंतर कोण झाला घराचा नवा कॅप्टन? गौरव खन्ना की फरहाना भट्ट
थामा हा एक आगामी हिंदी हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, जो मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा पाचवा भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे, ज्यांना ‘मुंज्या’ या चित्रपटासाठी ओळखले जाते.या चित्रपटात रश्मिका मंदाना पहिल्यांदाच अभिनेता आयुषमान खुराणासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. यापूर्वी ही अभिनेत्री ‘छावा’ या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती, ज्यात तिची जोडी विकी कौशलसोबत पाहायला मिळाली होती.