(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिला अलीकडेच तिच्या ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा सन्मान मिळाल्यानंतर राणीने एका मुलाखतीत एक भावनिक किस्सा शेअर केला आहे. तिची मुलगी आदिरा चोप्रा सुद्धा या पुरस्कार सोहळ्याचा भाग बनू इच्छित होती, मात्र वयाच्या अटीमुळे तिला सहभागी होता आलं नाही, आणि त्यामुळे ती खूप रडली. राणीने या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावताना एक नेकलेस घातला होता. या नेकलेसमध्ये तिच्या मुलीचे नाव दिसत आहे. आदिरा या नावाची अक्षरे या नेकलेसवर दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या नेकलेसची चर्चा रंगली आहे.
राणीने सांगितलं, “आदिरा खूप रडत होती. तिला राष्ट्रीय पुरस्कार समारंभात यायचं होतं, पण आम्हाला सांगण्यात आलं की १४ वर्षांखालील मुलांना तिथे येण्याची परवानगी नाही. त्यामुळे मला तिला सांगावं लागलं की तू माझ्यासोबत येऊ शकत नाहीस.त्यानंतर राणीने आदिराला दिलासा देत सांगितलं, “काळजी करू नकोस, या खास दिवशी मी तुला माझ्या मनात आणि आठवणींत सोबत घेऊन जाणार आहे.”
‘रील स्टार’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न; १७ ऑक्टोबरला महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
राणी मुखर्जी पुढे म्हणाली, माझ्या मुलीला माझ्याबरोबर ठेवण्याचा हा नेकलेस घालणे हा सर्वात जवळचा मार्ग होता. ती म्हणाली, ”ती माझी लकी चार्म आहे, मला ती माझ्यासोबत हवी होती आणि हे मी करू शकणारा सर्वात जवळचा मार्ग होता.”
राणी मुखर्जीने लोकांचे आभार मानले आणी म्हणाली, “मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी ‘राणी तिच्या मुलीला बरोबर घेऊन गेली’ असे लिहिलेले इन्स्टाग्राम रील्स बनवले. हे रील्स मी आदिराला दाखवले आणि त्यामुळे ती शांत झाली.
‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आशीमा छिब्बर यांनी केलं असून, हा चित्रपट सागरिका चक्रवर्ती यांच्या सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.या चित्रपटाने ओटीटीवरही प्रेक्षकांची मनं जिंकली.हा चित्रपट एक संवेदनशील आणि हृदयस्पर्शी कथानक सादर करतो, ज्यामध्ये राणीचा परिपक्व अभिनय विशेषतः उठून दिसतो. राष्ट्रीय पुरस्काराने तिच्या अभिनयाला मिळालेली दाद ही तिच्या चाहत्यांसाठी एक अभिमानाचा क्षण ठरली आहे.