Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ह्युमन कोकेन’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित; अंधारमय, धोकादायक आणि भयानक वास्तवाने प्रेक्षक स्तब्ध

मराठी अभिनेता पुष्कर जोगचा आगामी चित्रपट 'ह्यूमन कोकेन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्याने प्रेक्षकांना थक्क केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 12, 2025 | 12:56 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘ह्यूमन कोकेन’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित
  • धोकादायक आणि भयानक वास्तवाने प्रेक्षक स्तब्ध
  • ‘ह्यूमन कोकेन’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
 

‘ह्यूमन कोकेन’चा ट्रेलर अखेर विविध माध्यमांवर प्रदर्शित झाला असून काही क्षणांतच प्रेक्षकांच्या उत्सुकता आणखी वाढली. धक्कादायक दृश्यांची मालिकाच जणू या ट्रेलरमध्ये उलगडत आहे. गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या निष्ठूर संघर्षाच्या लपलेल्या जगाचे सत्य, क्रूर आणि निःसंकोच चित्रण यातून दिसते आहे.

या ट्रेलरमध्ये पुष्कर जोग अगदी नव्याच रूपात झळकताना दिसत आहे. अभिनेता पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात झळकणार असून त्याची महत्वपूर्ण भूमिका आहे. एका भयानक जाळ्यात अडकलेला कैद्याची तो भूमिका साकारताना दिसणार आहे. जिथे सुटकेचे मार्गच उरलेले नाही. रोमँटिक आणि हलक्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी इशिता राज प्रथमच एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. पुष्करसोबत कैद झालेली तिची भूमिका ट्रेलरची भावनिकता वाढवते. आणि प्रत्येक पडद्यावरील क्षणातील तणाव आणखी रहस्यमय करते.

Birth Anniversary: सर्वोत्कृष्ट मॉडेल ते टीव्ही सुपरस्टार; आईचा एक निर्णय बनला सिद्धार्थ शुक्लाचा टर्निंग पॉइंट, बदलले आयुष्य

सिद्धांत कपूर आपल्या हटके आणि धाडसी रूपात लक्ष वेधून घेतो. त्याचे रूप, त्याची उपस्थिती सर्व काही रहस्य आणि अस्वस्थता वाढवणारे आहे. तर ज्येष्ठ अभिनेते जाकीर हुसेन अंगावर काटा आणणाऱ्या भूमिकेत दिसत आहेत. पडद्यावर त्यांची उपस्थितीच भीती निर्माण करण्यास पुरेशी ठरते. ‘ह्युमन कोकेन’ ही कथा अत्यंत महागड्या, नव्या आणि मानवी मन सुन्न करणाऱ्या अमानुष प्रक्रियेतून तयार होणाऱ्या कोकेनच्या प्रकाराभोवती फिरते. या निःसंवेदनशील सत्याच्या गर्तेत पुष्कर जोग आणि इशिता राज सापडतात आणि त्यांचा या भीषण अंधाऱ्या जगात कसा ऱ्हास होतो, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. निखळ वास्तवावर आधारित ही कथा अंडरवर्ल्डच्या अंधाऱ्या आणि दडवलेल्या जगाचा पर्दाफाश करणारी आहे.

 

चित्रपटाबद्दल बोलताना पुष्कर जोग म्हणाला, ” ‘ह्यूमन कोकेन’ने मला कलाकार आणि माणूस म्हणून आकार दिला आहे. माझ्या व्यक्तिरेखेची असहाय्यता, भीती आणि अंतर्गत तडफड कॅमेरा बंद झाल्यानंतरही मनात जिवंत राहिली. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वांत महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे.”

स्टार प्रवाहची नवीन मालिका ‘तुझ्या सोबतीने’, खलनायिका शालिनीचा दमदार कमबॅक, नवी अभिनेत्री कोण?; प्रोमो पाहा

इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही प्रभावी ब्रिटीश कलाकारांच्या दमदार भूमिकांनी सजलेला हा चित्रपट आंतरराष्ट्रीय धाटणीचा अनुभव देतो. सारिम मोमिन लिखित–दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती स्कार्लेट स्लेट स्टुडिओज, वाइनलाइट लिमिटेड, टेक्स्टस्टेप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि गूजबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण सोपन पुरंदरे, संपादन संदीप फ्रान्सिस, दमदार पार्श्वसंगीत क्षितिज तारे यांचे असून नृत्यदिग्दर्शन पवन शेट्टी आणि खालिद शेख यांनी सांभाळले आहे. हा चित्रपट येत्या १६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The dangerous trailer of human cocaine has been released pushkar jog will be seen in a hindi film for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi actor

संबंधित बातम्या

Birth Anniversary: सर्वोत्कृष्ट मॉडेल ते टीव्ही सुपरस्टार; आईचा एक निर्णय बनला सिद्धार्थ शुक्लाचा टर्निंग पॉइंट, बदलले आयुष्य
1

Birth Anniversary: सर्वोत्कृष्ट मॉडेल ते टीव्ही सुपरस्टार; आईचा एक निर्णय बनला सिद्धार्थ शुक्लाचा टर्निंग पॉइंट, बदलले आयुष्य

Dhurandhar चा होणार खेळ खल्लास! Avatar 3 देणार टक्कर; ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहून व्हाल चकीत
2

Dhurandhar चा होणार खेळ खल्लास! Avatar 3 देणार टक्कर; ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहून व्हाल चकीत

Dhurandhar बॉक्स ऑफिसवर सुस्साट! सातव्या दिवशीही कोटींचा गल्ला, Worldwild Collection ‘ही’ कमाल
3

Dhurandhar बॉक्स ऑफिसवर सुस्साट! सातव्या दिवशीही कोटींचा गल्ला, Worldwild Collection ‘ही’ कमाल

Rajinikanth Birthday: वयाच्या ७४ व्या वर्षी दिले सुपरहिट चित्रपट; आधी सहाय्यक भूमिका, आणि नंतर साऊथचा ‘थलाईवा’ बनून केले राज्य
4

Rajinikanth Birthday: वयाच्या ७४ व्या वर्षी दिले सुपरहिट चित्रपट; आधी सहाय्यक भूमिका, आणि नंतर साऊथचा ‘थलाईवा’ बनून केले राज्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.