Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल

नुकताच टायगर श्रॉफच्या आगामी 'बागी ४' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. आता अशी बातमी समोर आली आहे की या चित्रपटाच्या सेटवर दोन कलाकार अपघाताचे बळी ठरले आहेत, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 13, 2025 | 05:49 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

टायगर श्रॉफ पुढील महिन्यात ‘बागी ४’ चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. एकीकडे त्याचे सर्व चाहते या चित्रपटासाठी उत्सुक असतानाच दुसरीकडे या चित्रपटाच्या सेटवरून एक वाईट बातमी आली आहे. या सेटवरील दोन कलाकार १२ फूट उंचीवरून जमिनीवर पडले. दोघेही शूटिंगच्या तयारीत व्यस्त होते. मात्र, त्यादरम्यान त्यांच्यासोबत एक अपघात झाला, त्यानंतर दोघांनाही मालाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या दोघांची तब्येत कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

सोमवारी संध्याकाळी मड आयलंड येथील चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉईजचे सरचिटणीस अशोक दुबे म्हणाले, ‘बागी ४’ च्या पॅचवर्क दरम्यान दोन कलाकार जखमी झाले आहेत. त्यांना मालाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहिल्या व्यक्तीचे नाव शमीम आहे, जो बंदुक पुरवठा विभागाचा आहे आणि तो एका अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंगची तयारी करत होता.’ असे त्यांनी सांगितले.

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज

दुसऱ्या कलाकाराचे नाव काय होते?
पुढे ते म्हणाले की, “दुसऱ्या कलाकाराचे नाव शाहनवाज आहे, जो एक ज्युनियर आर्टिस्ट आहे. जेव्हा ते दोघेही खाली पडले तेव्हा दोघेही १२ फूट उंचीवर उभे होते.” अशोक दुबे यांनी असेही सांगितले की त्यांनी त्यांच्या एका सहकाऱ्याला दोन्ही जखमी क्रूला पाहण्यासाठी पाठवले होते. तसेच आता या दोघांची तब्येत कधी आहे हे देखील त्यांनी सांगितले आहे.

प्रोडक्शनने उपचारांचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले
अशोक दुबे यांनी असेही म्हटले आहे की, “मी प्रोडक्शनशी बोललो आहे आणि त्यांनी मला सांगितले आहे की दोन लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी मला वचन दिले आहे की ते दोघांच्याही उपचाराचा खर्च उचलतील.” ज्या दिवशी ही दुर्घटना घडली, त्या दिवशी चित्रपटामधील गाण्याचे शूटिंग सुरू होते. टायगर श्रॉफ त्या गाण्याचा भाग होता. त्यानंतर तो सेटवरून निघून गेला. ही दुर्घटना घडली तेव्हा तो सेटवर नव्हता. असे त्यांनी म्हटले आहे.

दोन लग्न केल्याप्रकरणी युट्यूबर अरमान मलिक अडकला अडचणीत, तिघांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल

‘बागी ४’ मध्ये टायगर दिसणार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर संजय दत्त देखील या चित्रपटात दिसणार आहे. तो खलनायकाची भूमिका साकारत आहे. सोनम बाजवा आणि हरनाज कौर संधू देखील या चित्रपटाचा भाग आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याआधी ११ ऑगस्ट रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. ए. हर्ष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि साजिद नाडियाडवाला त्याचे निर्माते आहेत.

Web Title: Tiger shroff baaghi 4 two artist injured after falling from 12 feet height

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • tiger shroff

संबंधित बातम्या

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी
1

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी

Donald Trump: ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; भारतीय चित्रपटांवरही होणार परिणाम?
2

Donald Trump: ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; भारतीय चित्रपटांवरही होणार परिणाम?

अक्षय खन्नाला ‘शुक्राचार्यां’च्या अवतारात पाहून चाहत्यांना झाली बिग बींची आठवण, दिली अशी प्रतिक्रिया
3

अक्षय खन्नाला ‘शुक्राचार्यां’च्या अवतारात पाहून चाहत्यांना झाली बिग बींची आठवण, दिली अशी प्रतिक्रिया

२० वर्षांनी थिएटरमध्ये येणार ‘The Simpsons Sequel’, चित्रपट कधी आणि कुठे होणार प्रदर्शित
4

२० वर्षांनी थिएटरमध्ये येणार ‘The Simpsons Sequel’, चित्रपट कधी आणि कुठे होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.