(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
पॉल वेस्लीने त्याची प्रेयसी आणि मॉडेल नॅटली कुकेनबर्गशी साखरपुडा केला आहे. इटलीमध्ये सुट्टी घालवताना या जोडप्याने लग्न केले. नॅटलीने सोशल मीडियावर एका ब्लॅक-अँड-व्हाइट फोटोसह याची पुष्टी केली आहे. तसेच या बातमीने त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. पॉल वेस्लीने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच खळबळ उडाली आहे.
नताली कुसेनबर्गने देखील शेअर केली पोस्ट
नताली कुसेनबर्गने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एका मुलीच्या हातात एक डायमंनची अंगठी दिसत आहे आणि एक व्यक्ती तिचा हात धरून आहे. या फोटोसोबत नतालीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘होय नेहमीच आणि कायमचे.’ या खास पोस्टवरून हे स्पष्ट होते की नतालीने पॉलशी साखरपुडा केला आहे. ही तिची इंगेजमेंट अंगठी आहे. नतालीच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिला खूप शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
‘डॉन’ चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक Chandra Barot यांचे निधन; चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा
गोळीबारानंतर पुन्हा सुरु झाला ‘Kaps Cafe’, कपिल शर्माने केले टीमचे कौतुक; म्हणाला ‘अभिमानास्पद…’
पॉल आणि नताली यांच्या नात्याबद्दल
माध्यमांच्या वृत्तानुसार, पॉल आणि नताली २०२२ पासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघेही पहिल्यांदा इटलीमध्ये एकत्र दिसले होते. तेव्हापासून ते अधूनमधून सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत आहेत. नतालीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पॉलला तिचा सोलमेट म्हणून वर्णन केले होते आणि जूनमध्ये तिने तिच्या वाढदिवशी त्याला तिचा आवडता व्यक्ती म्हटले होते. पॉलबद्दल बोलायचे झाले तर, पॉलचे पहिले लग्न इनेस डी रॅमनशी झाले होते, ज्याचा घटस्फोट २०२४ मध्ये झाला होता. पॉल आणि नतालीने अद्याप लग्नाची तारीख निश्चित केलेली नाही, परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे पाहता, चाहते साध्या लग्नाची अपेक्षा करत आहेत.