(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
कॅनडामधील कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफे ‘कॅप्स कॅफे’वर १० जुलै रोजी हल्ला झाला होता. १० दिवसांनंतर, कॅफे आणि कपिल शर्मा यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे कॅफे पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली आहे. हल्ल्यानंतर कॅफेचे दरवाजे उघडले असल्याचे कॅफेने लिहिले आहे. तसेच हा कॅफे पुन्हा एकदा सुरु झाल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. याचदरम्यान कपिल शर्माने संपूर्ण टीमचे कौतुक देखील केले आहे.
कपिल शर्माने शेअर केली पोस्ट
आता कॅफेने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिले आहे की, ‘आम्हाला तुमची खूप आठवण आली. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत. मनापासून धन्यवाद देऊन, आम्ही पुन्हा आमचे दरवाजे उघडत आहोत. आम्ही तुमचे स्वागत करण्यास पुन्हा तयार आहोत. लवकरच भेटू.’ कपिल शर्मा यांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर ही पोस्ट पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘मला टीमचा अभिमान आहे.’
१० जुलै रोजी कॅफेवर झाला गोळीबार
अलीकडेच, विनोदी कलाकार कपिल शर्मा आणि त्यांची पत्नी गिन्नी चतरथ यांनी कॅनडामध्ये एक कॅफे उघडला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यावर हल्ला झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १० जुलै रोजी सकाळी १:५० वाजता (स्थानिक वेळेनुसार) सरे येथील ‘कॅप्स कॅफे’ बाहेर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबाराच्या वेळी काही कर्मचारी रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होते, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. परंतु या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली.
हल्ल्यानंतर कॅफेने दिली होती प्रतिक्रिया
या घटनेनंतर कॅप्स कॅफेने एक पोस्ट लिहिली. कॅफेने लिहिले की, ‘आम्ही स्वादिष्ट कॉफी आणि मैत्रीपूर्ण संभाषणाद्वारे आनंद आणण्याच्या आशेने कॅप्स कॅफे उघडले. त्या स्वप्नाशी हिंसाचाराचा संघर्ष हृदयद्रावक आहे. आम्ही या धक्क्यातून सावरत आहोत, परंतु आम्ही हार मानणार नाही.’ असे लिहून कॅफेन ही पोस्ट शेअर केली होती. आता पुन्हा एकदा नवी पोस्ट शेअर करून कॅप्स कॅफे पुन्हा उघडले असल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
कपिल शर्मामुळे परिणितीच्या सासूची तब्येत बिघडली, तात्काळ केलं रुग्णालयात दाखल
खलिस्तानी दहशतवाद्यांवर संशय
हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांना संशय आला की हा लक्ष्यित हल्ला होता. या घटनेचा संबंध लाड्डी टोळीशी जोडला जात आहे. अधिकाऱ्यांना संशय आहे की याचे संबंध बंदी घातलेल्या खलिस्तानी दहशतवादी गट बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) शी असण्याचे शक्यता आहे.