(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या आगामी ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटाचा मनोरंजनाने भरलेला ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये विनोद आणि रोमान्सचा पूर्ण डोस पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथाही बऱ्याच प्रमाणात उलगडत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना आता आवडतो का नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ट्रेलरमध्ये उलगडली चित्रपटाची कथा
२ मिनिट ५४ सेकंदांच्या या ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथेची कल्पना येते. ट्रेलरमध्ये दाखवले आहे की वरुण धवन आणि सान्या मल्होत्रा रिलेशनशिपमध्ये आहेत आणि जान्हवी कपूर आणि रोहित सराफ हे कपल आहेत. पण नंतर काहीतरी घडते की रोहित आणि सान्या लग्न करत आहेत. आता त्यांच्या एक्स प्रेयसीला दाखवण्यासाठी आणि त्यांचे लग्न तोडण्यासाठी, वरुण आणि जान्हवी एकत्र वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात जेणेकरून त्यांना हेवा वाटेल. त्यानंतर, दोघेही यशस्वी होतात की वरुण-जान्हवी एकमेकांच्या प्रेमात पडतात? हे सर्व चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना समजणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Bigg Boss 19 : हे दोन स्पर्धक पुर्ण सिझनमध्ये असणार नाॅमिनेट! बिग बॉसने का दिली एवढी मोठी शिक्षा?
VARUN DHAWAN – JANHVI KAPOOR: ‘SSKTK’ TRAILER IS HERE – DUSSEHRA 2025 RELEASE… A delightful package of love, laughter, and emotions… The trailer of #SunnySanskariKiTulsiKumari – starring #VarunDhawan and #JanhviKapoor – is now LIVE.#SSKTKTrailer 🔗: https://t.co/iwTxp4ewVd… pic.twitter.com/v9oe3uURB6
— taran adarsh (@taran_adarsh) September 15, 2025
शशांक खेतान पुन्हा एकदा एक रोमँटिक-कॉमेडी कौटुंबिक मनोरंजन चित्रपट घेऊन येत आहे. ट्रेलर पाहून कळते की ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ नंतर, शशांक खेतान पुन्हा एकदा वरुण धवनसोबत त्याच प्रकारच्या रोमँटिक-कॉमेडी शैलीतील एक कौटुंबिक मनोरंजन चित्रपट घेऊन आले आहे. ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा वरुण धवनचा तोच जुना शैलीचा चित्रपट पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये काही पंच लाईन्स देखील ऐकायला मिळत आहे. तसेच आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चित्रपट दसऱ्याला होणार प्रदर्शित
शशांक खेतान दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूर व्यतिरिक्त, या चित्रपटात सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘सगळं नशिबावर आहे…’ आदिनाथ कोठारेने नव्या मालिकेबद्दल शेअर केल्या भावना, साकारणार मुख्य भूमिका
‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ चित्रपटाला टक्कर देताना दिसणार आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ऋषभ शेट्टी यांच्या बहुप्रतिक्षित ‘कांतारा’ चा दुसरा भाग आहे. ‘कांतारा’ नंतर प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळेच या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा आहे. अशा परिस्थितीत वरुण धवनसाठी बॉक्स ऑफिसवर टिकून राहणे इतके सोपे नसणार आहे.