(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नॅशनल अवॉर्ड विनर फिल्ममेकर एक उत्कृष्ट निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारेने आजपासून एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आणि मनातली धाकधूक, उत्सुकता तसेच मनातील सगळ्या भावना अभिनेत्याने व्हिडीओद्वारे सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. आजवर अनेक दर्जेदार कलाकृती घडवून चित्रपटामध्ये काम करताना दिसला. याचदरम्यान आता आदिनाथ टीव्ही माध्यमातून रोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“नशीबवान” या मालिकेतून आदिनाथ आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे. नशीबवान ही मालिका त्याचासाठी दुहेरी कारणासाठी खास अजून निर्मिती आणि अभिनय दोन्ही धुरा तो सांभाळताना दिसणार आहे. आता आदिनाथ कोठारेया दोन्ही भूमिका कश्या साकारणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. “नशीबवान” चित्रपटामध्ये अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच तो पहिल्यांदाच नवीन मालिकेत काम करताना दिसणार आहे.
एकीकडे बॉलीवूडमध्ये असलेले बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि आता आदिनाथची मालिका हे सगळंच बघण्यासाठी प्रेक्षक देखील तितकेच उत्सुक आहेत. कामाचा वाढता व्याप असला तरी ही सगळी प्रोसेस तो अगदी हसतमुखपणे सांभाळताना दिसतो आहे. तसेच या नव्या मालिकेबद्दल तो आपले मत मांडताना दिसला आहे.
या बद्दल बोलताना आदिनाथ म्हणाला की, ‘आजपासून आमची मालिका तुमच्या भेटीला तर येत आहे पण आजवर माझ्या प्रत्येक कलाकृतीला जितकं प्रेम दिलं तेवढं या मालिकेला सुद्धा द्याल. आज या मालिकेचा एक कलाकार आणि निर्माता म्हणून मनात धाकधूक, उत्सुकता दडपण सगळं आहे पण तुमच्या आशीर्वादाने सगळचं छान निभावून जाईल यात शंका नाही. एक नवी पायवाट एक नवी भूमिका तर आहे पण तुमचं प्रेम कायम राहू दे बाकी सगळं नशिबावर आहे.’ असे आदिनाथ कोठारे म्हटले आहे.
आदिनाथच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो आगामी चित्रपट ‘गांधी’, ‘रामायण’ आणि अश्या अनेक उत्कंठावर्धक बॉलीवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. सोबतीला स्वतःची निर्मिती असलेल्या “झपाटलेला 3” आणि दिग्दर्शन असलेल्या “जय मल्हार” सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. अभिनेत्याचे हे सगळे आगामी प्रोजेक्ट्स पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.