(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या रोमँटिक-कॉमेडी ड्रामा चित्रपट ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे, कारण निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. आता हा चित्रपट कधी आणि कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार हे आपण जाणून घेणार आहोत.
मराठी माणूस ‘शिव ठाकरे’ने लाडक्या आजीला घडवली दुबईची सफर, फोटो पाहून चाहते भावुक
‘या’ दिवशी हा चित्रपट सिनेमागृहात होणार प्रदर्शित
वरुण धवनच्या आगामी ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन प्रदर्शन तारखेची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या एक्स अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे आणि म्हटले आहे की, हा चित्रपट आता गांधी जयंतीला म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये वरुण धवन हात जोडून मजेदार पोजमध्ये दिसत आहे. तसेच, तो सनी संस्कारच्या भूमिकेत देखील दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘सनी संस्कारीची शायरी – ‘हे अश्रू माझे समुद्राचे पाणी नाहीत, हे अश्रू माझे समुद्राचे पाणी नाहीत, पावसाची काय हमी आहे, आज उद्या नाही.’ असे लिहून ही पोस्ट शेअर केली आहे.
Sunny Sanskari ki shaayari –
‘Yeh aansoon hain mere, samundar ka jal nahin…
Yeh aansoon hai mere, samundar ka jal nahin…
Baarish ka kya bharosa, aaj hai…kal nahi!!!’😎#SunnySanskariKiTulsiKumari in cinemas, 2nd October 2025! pic.twitter.com/FOId7OSfPx— Dharma Productions (@DharmaMovies) July 14, 2025
जाणून घ्या चित्रपटाबद्दल
‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ हा चित्रपट शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर व्यतिरिक्त रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा देखील दिसणार आहेत. याआधी हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता आणि आता तो २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
वरुण धवनचे आगामी चित्रपट
वरुण धवनच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तो शेवटचा ‘बेबी जॉन’ चित्रपटामध्ये दिसला होता. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तो ‘बॉर्डर २’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो ‘है जवानी तो इश्क होना’ या चित्रपटाचेही शूटिंग करत आहे. अभिनेता अनेक नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.