Vicky Kaushal (फोटो सौजन्य-Instagram)
विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क स्टारर चित्रपट ‘बॅड न्यूज’ 19 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे ज्यामध्ये कॉमेडी पंच आणि प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या चित्रपटाचे प्रोमोशन सुद्धा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपासून खूप जोरदार सुरु आहे.
पहिल्या दिवसाच्या कमाईसह ‘बॅड न्यूज’ ही विकीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर सिनेमा ठरला आहे. एकीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. विकी या चित्रपटाचे दमदार प्रमोशन करत आहे. विकीने चित्रपटाचे प्रमोशनही अतिशय मजेशीर पद्धतीने केले. या चित्रपटाचा तौबा तौबा हा पेपी टायटल ट्रॅक प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. याच प्रोमोशन दरम्यान विकीने कतरिना सोबत नक्की कोणता चित्रपट करायला आवडेल याबद्दल संवाद साधला आहे.
एकत्र करणार हा चित्रपट
यासोबतच विकी कौशल अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या आणि कतरिनाच्या नात्याबद्दल बोलताना दिसला. आता अभिनेत्याने त्याच्या आणि कतरिना एकत्र काम करण्याबद्दल खुलासा केला आहे. वास्तविक, अनेक दिवसांपासून चाहते विकी आणि कतरिनाला चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अलीकडेच एका मुलाखतीत संवाद साधताना विकी कौशलला हा प्रश्न विचारण्यात आला आणि त्याच्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कथा कशी असावी?
विकी कौशलने सांगितले की, ‘मी आणि कतरिना लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहोत. आम्ही देखील अशीच कथेच्या शोधत आहोत. मला असा कोणताही चित्रपट करायचा नाही जो फक्त आमच्यासोबत बनला गेला असेल. चित्रपटात आमची जोडी असेल तर कथेची मागणीही तशीच असायला हवी, तरच बघायला मजा येईल. या कारणास्तव आम्ही आता वाट पाहत आहोत आणि कोणत्याही प्रकारची घाई करत नाही आहोत.” असे त्याने या बद्दल सांगितले आहे.
हे देखील वाचा- अनुराग कश्यप आता लहान मुलांवर चित्रपट घेऊन येणार, IFFM मध्ये होणार प्रीमियर!
कामाच्या आघाडीवर, आता नुकताच विकी ‘बॅड न्यूज’ या चित्रपटामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती Amazon Prime, धर्मा प्रॉडक्शन आणि लिओ मीडिया कलेक्टिव्ह यांनी संयुक्तपणे केली आहे. चित्रपटाची कथा सत्य घटनांवर आधारित आहे. हा चित्रपट 2019 च्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. तसेच विकी आता नवनवीन प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.