Little Thomas Film (फोटो सौजन्य-Instagram)
चार फिल्मफेअर पुरस्कार पटकावलेला दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या चित्रपट आणि भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटांनंतर प्रसिद्ध असलेल्या अनुराग कश्यपने ‘महाराज’ आणि ‘बॅड कॉप’ मध्येही खलनायकाची भूमिका साकारली आहे. आत्तापर्यंत, बहुतेकदा प्रौढ आणि गुन्ह्यांशी संबंधित चित्रपट या दिग्दर्शकाने बनवलेले प्रेक्षकांनी पहिले आहेत. परंतु, आता अनुराग कश्यप लहान मुलांवर आधारित चित्रपट घेऊन येत आहे.
IFFM मध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार
कौशल रझा दिग्दर्शित ‘लिटिल थॉमस’मध्ये गुलशन देवैया आणि मिर्झापूरची रसिका दुग्गल दिसणार आहेत. कौशल रझा यांचे या चित्रपटांमधून पहिले दिग्दर्शनात पदार्पण आहे. याआधी त्यांनी ‘आफ्टरग्लो’ आणि ‘वैष्णव जन तो’साठी दोनदा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. आता मुलांवर आधारित ‘लिटिल थॉमस’ हा त्यांचा दिग्दर्शित उपक्रम प्रदर्शित होणार आहे, ज्याचा भारतीय चित्रपट महोत्सव मेलबर्न (IFFM) येथे जागतिक प्रीमियर होणार आहे. अनुराग कश्यप या चित्रपटाचा निर्माता असणार आहे.
या चित्रपटाबद्दल अनुराग कश्यप यांनी सांगितले की, “मी कौशलचा ‘द मिनिएच्युरिस्ट ऑफ जुनागड’ हा चित्रपट पाहिला आहे आणि मला तो खूप आवडला आहे. यानंतर मी ‘लिटिल थॉमस’ची स्क्रिप्ट वाचली आणि त्याची दृष्टी समजली. मुलांवर आधारित एक अस्सल चित्रपट बनवायचा होता, ज्यांचे जग मुलांच्या विचारांवर आधारित आहे.” तर असा चित्रपट घेऊन येणे त्यांच्यासाठी आवश्यक होते. म्हणून हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
गोव्याच्या पार्श्वभूमीवर बनवला आहे हा चित्रपट
‘लिटिल थॉमस’चा बालकलाकार हृदयांश पारेख या चित्रपटामध्ये मुख्यभूमीकेत दिसणार आहे. गोव्याच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. ‘लिटिल थॉमस’ची कथा एका अशा मुलाची आहे जो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याला एक लहान भाऊ हवा आहे. या चित्रपटाबद्दल गुलशन देवय्या म्हणाले की, हा एक गोड, गोंडस चित्रपट आहे आणि मला आनंद आहे की हा चित्रपट IFFM मध्ये जात आहे. असे त्यांनी सांगितले.