Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनीत पड्डाच्या ‘शक्ती शालिनी’मध्ये दमदार अभिनेत्याची एन्ट्री; चित्रपट नक्कीच होणार सुपरहिट!

बॉलीवूड अभिनेता विनीत सिंग त्याच्या प्रभावी अभिनयासाठी ओळखला जातो. २०२५ मध्ये विनीतने 'छावा' आणि 'जाट' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. दरम्यान, अभिनेता आता अनित पड्डासोबत दिसणार असल्याचे समोर आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 30, 2026 | 11:04 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अनीत पड्डाच्या ‘शक्ती शालिनी’मध्ये अभिनेत्याची एन्ट्री
  • चित्रपट नक्कीच होणार सुपरहिट
  • कोण आहे हा अभिनेता?
 

विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकी खळबळ माजवली की त्याने अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले. या चित्रपटात विनीत सिंगने दमदार अभिनय केला होता. त्यानंतर त्याने सनी देओलच्या ‘जाट’ या चित्रपटातून आपली छाप पाडली. दरम्यान, विनीत सिंगच्या आगामी चित्रपटाबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. असे वृत्त आहे की तो अनित पड्डासोबत आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे.

Exclusive: ‘कोणत्याही भूमिकेत प्रेक्षकांनी मला स्वीकारावं’, सोनाली पंडितचा 10 वर्षांनी मराठीत कमबॅक

विनीत कुमार सिंग साकारणार खलनायकाची भूमिका

विनीत कुमार सिंगने आता आणखी एक मोठा चित्रपट मिळवला आहे. ‘व्हेरायटी इंडिया’च्या वृत्तानुसार, तो ‘शक्ती शालिनी’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटात ‘सैयारा’ फेम अनित पड्डा आणि प्रसिद्ध विशाल जेठवा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विनीत कुमार सिंगने चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्याच्या खलनायकी भूमिकेबद्दल आणि त्याचे पात्र कथेला कसे बळकट करेल याबद्दल बरीच उत्सुकता लागली आहे.

‘शक्ती’ हा शालिनी मॅडॉक हॉरर युनिव्हर्समधील सहावा चित्रपट आहे, ज्याअंतर्गत यापूर्वी ‘स्त्री’, ‘भेडिया’, ‘मुंज्या’, ‘स्त्री २’ आणि ‘थम्मा’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी ‘मुंज्या’ आणि ‘थम्मा’ यांचे दिग्दर्शन केले होते. ‘सलाम वेंकी’नंतर विशाल जेठवा आणि अनित पड्डा या चित्रपटात पुन्हा एकत्र आले आहेत, जिथे त्यांच्या केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले होते.

‘Dhurandhar 2’ ने पहिल्या भागाचा मोडला रेकॉर्ड; Ranveer Singh च्या चित्रपटाची छप्परफाड कमाई

शक्ती शालिनी कधी होणार प्रदर्शित?

‘शक्ती शालिनी’ चित्रपटाची कथा अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे, परंतु ‘थामा’ चित्रपटाच्या क्लायमॅक्स दरम्यान प्रदर्शित झालेल्या टीझरवरून असे दिसते की, अनित पड्डाचे पात्र शक्ती शालिनी खूप शक्तिशाली असेल. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २४ डिसेंबर जाहीर केली होती, परंतु त्याच दिवशी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा ‘किंग’ हा चित्रपटही प्रदर्शित होत असल्याने, नवीन तारखेचा विचार केला जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अनित पड्डाने ‘सैयारा’ या चित्रपटात अहान पांडेसोबत उत्कृष्ट अभिनय केला होता. अनित पड्डा आणि अहान पांडे यांची जोडी चाहत्यांची आवडती बनली, आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला.

Web Title: Viineet kumar singh joins aneet padda film shakti shalini

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

अरे देवा! चक्क ५ वीच्या पुस्तकात छापलं ऐश्वर्या रायचं ‘निंबुडा-निंबुडा’ गाणं; शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची जोरदार चर्चा
1

अरे देवा! चक्क ५ वीच्या पुस्तकात छापलं ऐश्वर्या रायचं ‘निंबुडा-निंबुडा’ गाणं; शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची जोरदार चर्चा

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
2

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन
3

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’
4

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.