(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
विक्रम भट्ट हे बॉलिवूडमध्ये त्यांच्या हॉरर शैलीतील चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा ‘तुमको मेरी कसम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये चित्रपटाच्या कथेला थ्रिलरचा स्पर्श आहे, त्याचबरोबर कोर्ट रूम ड्रामा देखील या चित्रपटामध्ये दिसण्याची शक्यता आहे. तसेच विक्रम भट्ट हे नेहमीच त्यांच्या भयपट चित्रपटासाठी ओळखले जातात. तसेच त्यांच्या या नव्या चित्रपटामध्ये भयपटापेक्षाही खतरनाक अनुभव पाहायला मिळणार आहे.
ही कथा आयव्हीएफच्या संदर्भात दाखवली आहे
‘तुमको मेरी कसम’ चित्रपटात अनुपम खेर एका आयव्हीएफ हॉस्पिटलशी संबंधित असल्याचे दिसून येते आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये कोर्ट रूमचे सीनही दिसत आहेत. आयव्हीएफ आणि कोर्ट केसचा काय संबंध आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजणार आहे. पण टीझरमध्ये अनुपम खेर, अदा शर्मा आणि ईशा देओल यांचे संवाद जबरदस्त दिसत आहेत. तसेच हा चित्रपट पाहण्याची चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
विश्वास की परिस्थिती ? ‘द प्रेयर’ शॉर्ट फिल्ममधून उलगडणार मानवी मनाची अवस्था
या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘तुमको मेरी कसम’ हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २१ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विक्रम भट्ट या चित्रपटाची निर्मिती इंदिरा एंटरटेनमेंट एलएलपीने केली आहे. महेश भट्ट हे इंदिरा एंटरटेनमेंटच्या सहकार्याने हा चित्रपट सादर करत आहेत. चित्रपटाचे प्रकल्प दिग्दर्शक श्वेतांबरी भट्ट, कृष्णा भट्ट सरदा हे करणार आहेत.
चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट
‘तुमको मेरी कसम’ या चित्रपटात अनुपम खेर आणि अदा शर्मा यांच्याशिवाय इश्वाक सिंग, ईशा देओल, मेहरजान मजदा आणि सुशांत सिंग यांच्याही भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाची कथा अनुपम खेर यांच्या व्यक्तिरेखेभोवती गुंफलेली आहे. हा चित्रपट डॉ. अजय मुरिया यांच्या जीवनातून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. विक्रम भट्ट यांनी ही कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शनही केले आहे.
विक्रम भट्ट यांचे जुने चित्रपट
‘तुमको मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे विक्रम भट्ट एक भावनिक, थ्रिलर कथा सादर करत आहेत पण त्यांना हॉरर चित्रपटांचे मास्टर मानले जाते. त्यांनी ‘फिअर’, ‘१९२०’, ‘शापीत’, ‘हॉन्टेड ३ डी’, ‘राज ३ डी’, ‘क्रिएचर ३ डी’, ‘राज रिबूट’, ‘१९२१’, ‘घोस्ट’, ‘जुदा होके भी’ असे चित्रपट बनवले आहेत. हे सगळे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. तसेच या सगळ्या चित्रपटामधील गाणी चाहत्यांना आवडली आहेत.