
फोटो सौजन्य - Social Media
NEET Paperleak प्रकरणी काय म्हणाला Vishal Dadlani?
Vishal Dadlani ने त्याच्या @vishaldadlani या सोशल मीडिया हॅण्डलवरून पोस्ट शेअर केली आहे. Video पोस्ट करण्यामागचे कारण सांगताना तो म्हणतो की, “मी ही Video त्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे, ज्यांचा NEET पेपरफुटी प्रकरणामुळे वर्ष वाया गेलं आहे, ज्यांचा वेळ वाया गेला आहे.” पुढे विशाल म्हणतो की, “हे फार चुकीचं आहे. हे प्रत्येक वर्षी घडतं. सगळ्यात दुदैवी म्हणजे देशातील कोणत्याही संस्थानाला याची जबाबदारी घ्यायची नाहीये. सगळ्यात वाईट तेव्हा वाटतं जेव्हा खुर्चीवर बसलेले मंत्री म्हणतात ‘यात काय मोठी गोष्ट आहे!'” विशालने सत्तेत बसणाऱ्या अशिक्षित राजकारण्यांना टोला लगावत म्हंटल आहे की, “दुर्दैव म्हणजे आपण अशा वेळेत जगत आहोत, जिथे देशात शिक्षणाला काही किंमत नाहीये, कारण सत्तेत बसणारे शिक्षित नाहीयेत आणि हेच आपल्या भारताला एकेदिवशी नष्ट करणार आहे.”
विशालने देशाच्या जनतेला आवाहन केले आहे. पुढे तो म्हणतो की, “चांगल्या आणि शिक्षित नेत्यांना आपले मतदान करा. जर आपल्याला आपल्या देशाचे भविष्य उत्तम घडवायचे असेल तर जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे विचार करून एका चांगल्या आणि शिक्षित नेत्याला मतदान करावे लागेल. अशा अशिक्षित लोकांना सत्तेत नका आणू, मग तो उमेदवार तुमच्या जातीतला असो, धर्मातला किंवा घरातला! आता खूप झालं!”
विद्यार्थ्यांनी केले सांत्वनाचं कौतुक!
NEET पेपरफुटीमुळे ग्रस्त विद्यार्थ्यांना विशालकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्यांनी त्याचे आभार मानले आहे. तसेच त्याच्या विचारांचे कौतुक केले आहे.