फोटो सौजन्य - Social Media
गेल्या पाच वर्षांत या महोत्सवाने मराठी चित्रपटप्रेमींच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. प्रादेशिक कथाकथनाला नवे व्यासपीठ मिळवून देत मराठी सिनेमाच्या समृद्ध परंपरेला पुढे नेण्याचे काम या फेस्टिव्हलने सातत्याने केले आहे. त्यामुळेच हा महोत्सव आता राज्यातील महत्त्वाच्या सिनेमोत्सवांपैकी एक मानला जातो. यंदाच्या पर्वात समकालीन चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या क्लासिक चित्रपटांचे विशेष प्रदर्शन होणार आहे. त्यामध्ये Jait Re Jait, Tighi, Gondhal आणि Dashavatar या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय कलाकार-दिग्दर्शकांसोबत संवाद, पॅनल डिस्कशन्स आणि बदलत्या प्रादेशिक कथनशैलीवर चर्चासत्रेही आयोजित करण्यात येणार आहेत.
या सोहळ्यात Mahesh Manjrekar, Amruta Subhash, Girish Kulkarni, Shivraj Waichal आणि Siddharth Jadhav यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या महोत्सवातील विशेष आकर्षण ठरणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री Suhas Joshi यांना प्रदान करण्यात येणारा ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’. रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
उदयोन्मुख दिग्दर्शक आणि नव्या पिढीतील कथाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी Film Critics Guild आणि Anupama Chopra यांचे सहकार्य लाभले आहे. याबाबत बोलताना रेड एफएमच्या संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी Nisha Narayanan यांनी सांगितले की, प्रादेशिक कथा अधिक व्यापक सांस्कृतिक व्यासपीठावर पोहोचाव्यात हा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. मराठी सिनेमातील सर्जनशीलतेचा गौरव करत नव्या पिढीतील कथाकारांना प्रोत्साहन देण्याची संधी या महोत्सवातून मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.






