Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धुरंधर 2’वर विशाल दादलानीचा टोला; नोटबंदी सीनवर प्रेक्षकांना दिली माहिती तपासण्याची सूचना

विशाल दादलानीने इन्स्टाग्रामवर दोन स्टोरीज पोस्ट केल्या, ज्यात त्याने कोणाचेही नाव न घेता, आदित्य धरच्या 'धुरंधर २' या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये नोटाबंदीचा संदर्भ करण्यात आला आहे. कारण सत्य हे सत्यच असते.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 23, 2026 | 10:41 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘Dhurandhar 2 ’वर विशाल दादलानीचा टोला
  • नोटबंदी सीनवर प्रेक्षकांना दिली माहिती
  • विशाल दादलानी काय म्हणाले?
 

इराण-इस्रायल युद्धानंतर जर इतर कशाची चर्चा होत असेल, तर ती आहे रणवीर सिंगच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ची, ज्याने सध्या धुमाकूळ घातला आहे. प्रत्येकजण त्याबद्दल बोलताना दिसत आहे. नकारात्मक असो वा सकारात्मक, प्रत्येकजण प्रतिक्रिया देत आहे. या चित्रपटाने चार दिवसांत जगभरात बॉक्स ऑफिसवर ₹६९१.३२ कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच वीकेंडमध्ये हा चित्रपट ₹१००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. असो, चित्रपट पाहिल्यानंतर गायक विशाल दादलानीने नोटाबंदीच्या परिस्थितीवर एक उपहासात्मक टिप्पणी केली आहे.

गायक आणि संगीतकार विशाल दादलानीने शनिवार, २२ मार्च रोजी इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट टाकली. त्याने चित्रपटाचे नाव घेतले नाही, पण त्याच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले की तो आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाबद्दल बोलत होता आणि त्याने चित्रपटावर टोमणा देखील मारला आहे.

शिव ठाकरेने जिंकली पहिली The 50 ची ट्रॉफी; 50 लाखांचे बक्षीस मिळवणारा ‘तो’ चाहता कोण?

‘धुरंधर २’ मध्ये दाखवलेले नोटाबंदीचे दृश्य

‘धुरंधर 2’ चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचा मूळ व्हिडिओ ‘ऑपरेशन ग्रीन लीफ’ या गुप्त मोहिमेच्या रूपात दाखवण्यात आला आहे. या कारवाईमुळे दहशतवादी निधीपुरवठा नेटवर्कला मोठा फटका बसतो आणि जावेद खनानी अडचणीत सापडतो, कारण त्याने दाऊद इब्राहिमसाठी सुमारे 60,000 कोटी रुपयांच्या बनावट नोटा छापल्या होत्या. मात्र 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बंद झाल्याने त्याचा संपूर्ण डाव कोलमडून पडतो.

‘धुरंधर २’ वर विशाल दादलानीने साधला निशाणा

विशाल दादलानी यांनी कोणाचेही नाव न घेता लिहिले, “चित्रपट मनोरंजनासाठी पाहा, पण माहिती नेहमी विश्वसनीय स्रोतांमधूनच घ्या. सध्या ज्या गोष्टी दाखवल्या जात आहेत, त्यात हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की चित्रपट हा केवळ मनोरंजन असतो; सत्य मात्र सत्यच राहत, काहीही झालं तरी.” यासोबतच त्यांनी काही लेखही शेअर केला आहे, ज्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की 2016 मधील नोटबंदीनंतरही भारतातील दहशतवादी हल्ले पूर्णपणे थांबले नाहीत. 2019 मध्ये पुलवामा हल्ला झाला, तसेच सीमारेषेवर तणावाची स्थिती कायम राहिली. नोटबंदीचा उद्देश दहशतवादी निधीपुरवठ्यावर लगाम लावणे हा होता, मात्र त्यातून दहशतवादी हल्ल्यांमध्ये ठोस घट झाल्याचे दिसून आले नाही.

Dhurandhar 2: पहिल्याच आठवड्यात 700 कोटींचा टप्पा पार; ‘बाहुबली २’ ते ‘गदर २’ पर्यंतचे रेकॉर्ड धुळीस

विशाल दादलानी यांचा दावा

आर्टिकलमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकच्या (RBI) माहितीनुसार दावा करण्यात आला आहे की, नोटबंदीनंतर सुमारे 99.3% चलन बँकिंग प्रणालीत परत आले. 8 नोव्हेंबर 2016 पर्यंत 1000 आणि 500 रुपयांच्या नोटांचे एकूण 15.41 लाख कोटी रुपये चलनात होते. यापैकी 15.31 लाख कोटी रुपये जमा किंवा एक्सचेंज करण्यात आले, तर सुमारे 10,720 कोटी रुपये म्हणजेच 0.7% रक्कम बँकिंग प्रणालीत परत आली नाही.

Web Title: Vishal dadlani takes indirect dig at dhurandhar the revenge over demonetisation scene

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
2

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
3

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
4

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.