फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नर्गिस फाखरीची बहीण आलिया फाखरी हिला तिचा एक्स प्रियकर आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपाखाली न्यूयॉर्कमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. आलिया हिने तिच्या एक्स-बॉयफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप आहे. तिने दोन मजली गॅरेजला आग लावून तिचा 35 वर्षीय एक्स-बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स आणि 33 वर्षीय अनास्तासिया यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया फाखरीने एडवर्ड आणि अनास्तासियाला गॅरेजमध्ये अडकवले आणि गॅरेजला आग लावली. यामध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला.
कोण आहे आलिया फाखरी?
आलिया फाखरी 43 वर्षांची आहे, ती रॉकस्टार फेम अभिनेत्री नर्गिस फाखरीची धाकटी बहीण आहे. आलियाचे पालनपोषण न्यूयॉर्क शहरातील क्वीन्स येथे झाले. त्याचे वडील मोहम्मद फाखरी पाकिस्तानी आहेत, तर आई मेरी फाखरी झेक आहे. नर्गिस आणि आलिया लहान असताना त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला. नर्गिस फाखरी यांच्या जवळच्या सूत्राने इंडिया टुडेला पुष्टी दिली आहे की अभिनेत्रीचा तिच्या बहिणीशी 20 वर्षांपासून कोणताही संपर्क नाही. नर्गिसलाही मीडियाकडून ही माहिती मिळाली आहे. सध्या ती या प्रकरणावर भाष्य करू इच्छित नाही.
काय म्हणाली आलियाच्या EX बॉयफ्रेंडची आई?
अहवालात असे सूचित होते की आलियाचे EX बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्सने तिच्यासोबत एक वर्षापूर्वी ब्रेकअप केला होता. त्याच्या आईने न्यूयॉर्क पोस्टला सांगितले की तिला ब्रेकअपवर विश्वास बसत नव्हता. जेकब्सच्या आईने सांगितले की, कोणत्याही सामान्य व्यक्तीप्रमाणे तो आलियाला समजवण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला सांगत होता की मी तुला कंटाळलो आहे. माझ्यापासून दूर जा. गेल्या एक वर्षापासून तो तिला एकटे सोडण्यास सांगत होता, मात्र ती हे मानायला तयार नव्हती.’ असे त्या पोलिसांना म्हणाल्या.
अभिनय सोडण्याच्या घोषणेनंतर विक्रांत मेस्सीची मीडियासमोर उपस्थिती, काय म्हणाला जाणून घ्या?
गुदमरून झाला दोघांचा मृत्यू
एडवर्ड जेकब्स आणि अनास्तासिया यांच्यात सुरुवातीला प्रेमसंबंध नव्हते. मात्र, त्यांच्यात मैत्री होती. एडवर्डच्या आईच्या म्हणण्यानुसार, दोघे (आलिया आणि एडवर्ड) एक वर्षापूर्वी वेगळे झाले होते, परंतु आलियाने तिचा पाठलाग सुरूच ठेवला होता. गॅरेजचे अपार्टमेंटमध्ये रूपांतर करण्यासाठी जेकब्स एका मालमत्तेवर काम करत होता. तेव्हा आग लागली आणि एडवर्ड आणि त्याच्या गर्लफ्रेंडचाही मृत्यू झाला. आलिया फाखरीने गॅरेजला आग लावली, एडवर्ड आणि अनास्तासियाला आत अडकवले आणि त्यांची हत्या केली. आगीच्या धुरामुळे श्वासोच्छवासामध्ये अडचणी निर्माण झाल्या. त्यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर आलियाला अटक करण्यात आली.