फोटो सौजन्य - lakshayonly सोशल मीडिया
लक्ष्य चौधरीवर दिल्लीत जीवघेणा हल्ला : सोशल मीडियावरचे इन्फ्लूएंसर आणि युट्युबर बऱ्याचदा त्याच्या सोशल मीडियावरील वादामुळे चर्चेत असतात. विशेषता युट्युबर जे बऱ्याचदा अनेकांना रोस्ट करत असतात त्याचे विरोधकांशी वाद पाहायला मिळतात. पण आता सोशल मीडियावरचे वाद हे जीवाचा खेळ झाला आहे आणि हे वाद आता जीवघेण्या हल्ल्यापर्यत पोहोचले आहेत. कॉमेडियन आणि युट्युबर समय रैना याचा मुद्दा आणि त्याचा शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. यावेळी समय रैनाच्या समर्थानात आणि रणवीर अलाबदिया या दोघांच्या बाजूने काही दिवसांआधी युट्युबर लक्ष्य चौधरीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केली होती यामध्ये त्याने अनेक वक्तव्य केली होती.
दुखापतीतून बरा होऊन विजय देवरकोंडा पोहचला ‘किंगडम’च्या शुटिंगला, चित्रपटाची नवीन अपडेट आली समोर
समय रैनाच्या वादाच्या वेळी युट्युबर लक्ष्य हा रशियाला फिरण्यासाठी गेला होता. आता तो भारतामध्ये येताच त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात माहिती त्याने त्याच्या सोशल मीडियावर दिली आहे. युट्युबर लक्ष्य चौधरीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची व्हिडीओ शेअर केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लक्ष्यने सांगितले की, रशियापासूनच आमचे फ्लाईट डिटेल्स ट्रॅक केले जात होते आम्ही शेअर केलेल्या सोशल मीडियाच्या स्टोरीवरून. जेव्हा आमची फ्लाईट १६ फेब्रुवारीला मॉस्कोवरून नवी दिल्ली टर्मिनलला फ्लाईट लॅन्ड झाली.
मशहूर yuotuber लक्ष्य चौधरी पर जानलेवा हमला किया गया जब ओ दिल्ली एयरपोर्ट से अपने घर को जा रहे थे.
रास्ते में कुछ लोगों नें उनके गाड़ी पर हमला किया और गाड़ी को छत्तीग्रस्त कर दिया.#lakshyachoudhary#delhirailwaystationpic.twitter.com/ZDA0FROaTw
— Ramu Kushwaha (@RAMUKUS87436498) February 16, 2025
पुढे तो म्हणाला की, माझा मित्र त्यानंतर मला घायला स्कॉर्पिओने विमानतळावर आला. त्यानंतर मी गाडी घेतली चालवण्यासाठी आणि आम्हाला दिल्ली विमानतळाच्या रस्त्यावरच एक इटिओस गाडी, २ थार यामध्ये अमन बेसला, हर्ष विकल्प ज्यांच्यावर मी मागे लास्ट व्हिडीओ बनवली होती युट्युबवर हे सगळी लोक होती त्याचबरोबर त्यांच्यासोबत ७-८ जण मी तर त्यांना गुंडच बोलणार कारण त्यांच्या हातामध्ये बरीच शस्त्र होती. मी सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडीओ आणि पुरावे सोबत लावत आहे. यांनी आमच्या गाडीवर अटॅक केला आहे आणि मर्डर करण्याचा प्रयत्न केला.
पुढे लक्ष्य म्हणाला की, आम्ही त्या जागेवरून गेलो नसतो आणि सिग्नल ओपन झाला नसता तर त्यांनी आम्हाला तिथेच मारले असते. माझ्या गाडीचे बरेच नुकसान झाले आहे असेही त्याने सांगितले आहे. सोशल मीडियावर लक्ष्य चौधरीने त्याच्या गाडीचा पाठलाग करणारे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याचबरोबर त्याच्या गाडीवर झालेल्या हल्लेच व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर त्याने दिल्ली पोलीसकडे सुद्धा जबाब मागितला आहे.