(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा कमालीचा चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्याच्या ‘किंगडम’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्यासोबतच चित्रपटाच्या शुटिंगही सध्या सुरु आहे. चित्रपटाचा काही भाग अजूनही शुटिंगचा बाकी असून अभिनेता खांद्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे आणि आता तो शुटिंगला परतला आहे. विजय देवरकोंडाच्या ‘किंगडम’ चित्रपटाची शुटिंग सध्या विशाखापट्टणम येथे सुरु आहे.
अलिकडेच अभिनेत्याच्या खांद्याला शुटिंग दरम्यान दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून अभिनेता आता सावरला असून त्याने आपल्या चित्रपटाच्या उरलेल्या शुटिंगला आजपासून सुरुवात केलेली आहे. २०२३ मध्ये ‘किंगडम’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी आहेत. ‘किंगडम’ मध्ये जबरदस्त अॅक्शन, दमदार कथा आणि विजयचा उत्तम अभिनय पाहायला मिळेल. विजय ‘किंगडम’ च्या सेटवर जखमी झाला होता. अभिनेत्याच्या टीमच्या मते, खांद्याच्या दुखापतीनंतरही विजयने शूटिंग सुरू ठेवले कारण त्याच्याकडे विश्रांती घेण्यासाठी वेळ नव्हता.
मराठी संगीत विश्वात पहिल्यांदाच कवितेतून साकारलं गाणं, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरलं!
चित्रपटाच्या निर्मितीसंबंधित एका विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात अॅक्शनसोबतच भावनाही आहेत. त्यातील ८० टक्के चित्रीकरण झाले आहे. २० टक्के भाग लवकरच पूर्ण होईल. चित्रपटाच्या उर्वरित भागाचे चित्रीकरण पुढील काही आठवड्यात जलद गतीने करण्याचा निर्णय टीमने घेतला आहे. ‘किंगडम’ चित्रपट ३० मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बहुप्रतिक्षित ‘किंगडम’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये विजय देवरकोंडाचा शक्तिशाली अवतार बघायला मिळाला. टीझरच्या सुरुवातीला, चित्रपटाची कथा एका आवाजाद्वारे सांगितली जात आहे. ज्यामध्ये युद्धाबद्दल बोलले जात आहे. यामध्ये अभिनेता अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.
साध्या सोज्वळ प्राजक्ता माळीची आगामी चित्रपटात हटके भूमिका, चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल
चित्रपटाचा टीझर १ मिनिट ५५ सेकंदांचा आहे. या चित्रपटाची कथा लोकांचे रक्षण आणि बचाव करण्यासाठीच्या युद्धाभोवती फिरत आहे. टीझरमध्ये विजय देवरकोंडाचा लूक देखील खूपच खतरनाक दिसत आहे. चित्रपटाचा टीझर सितारा एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट गौतम तिन्नानुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. टीझरमध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने हिंदी टीझरसाठी त्याचा खास आवाज दिला आहे.