(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिनेत्री सागरिका घाटगेने नुकतीच तिच्या नवीन चित्रपट ‘ललाट’ची घोषणा केली आहे, ज्याच्या सेटवरून तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांसोबत सागरिकाने एक भावनिक चिठ्ठीही लिहिली आहे. अभिनेत्री ‘चक दे इंडिया’ या बॉलीवूड चित्रपटानंतर आता अभिनेत्री दुसऱ्यांदा हिंदी चित्रपट ‘ललाट’ मध्ये राजस्थानी अवतारात काम करताना दिसणार आहे.
खरंतर, सागरिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘ललाट’ या आगामी हिंदी चित्रपटातील तिचा लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पारंपारिक पोशाखात दिसत आहे. सागरिकाच्या ‘ललाट’ या नवीन चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तिचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही आहे, परंतु तिच्या पहिल्या झलकाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. चाहत्यांना तिचा हा लुक खूप आवडला आहे.
सागरिकाने तिच्या आगामी ‘ललाट’ चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सागरिकाने लिहिले, ‘आमचा नवीन चित्रपट ‘ललाट’चा लूक प्रदर्शित होताच, मी यासाठी खूप उत्सुक आहे. हा एक आव्हानात्मक पण समाधानकारक प्रवास होता, विशेषतः अभिनयापासून काही काळ दूर राहिल्यानंतर, ते मला खूप आवडते ते करायला सुरुवात केली आहे. मी पूर्वी केलेल्या कोणत्याही भूमिकेपेक्षा खूप वेगळ्या भूमिकेसह परत आल्याबद्दल मी खूप आभारी आहे. या पटकथेने, या पात्राने मला लगेचच चित्रपटाच्या त्या जगात परत खेचून आणले जिथे मला रमायला आवडते. जे मी गमावले होते. प्रत्येक क्षण खूप खास होता आणि मला आशा आहे की मी पुढे जात राहीन आणि खरोखर हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथांचा भाग बनेन माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.” असे अभिनेत्रीने लिहून ही पोस्ट शेअर केली आहे.
सागरिकाने २००७ मध्ये शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यामध्ये तिने प्रीती सभरवालची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. प्रेक्षकांना तिचे काम खूप आवडले होते. या चित्रपटाच्या यशानंतर तिला अनेक ब्रँड एंडोर्समेंट्सही मिळाले.
Chhaava: नाकात नथ आणि कपाळावर कुंकू, महाराणी येसूबाईच्या भूमिकेत रश्मिका मंदानाचा समोर आला लूक!
सागरिकाने २००९ मध्ये ‘फॉक्स’, २०११ मध्ये ‘मिले ना मिले हम’ आणि २०१२ मध्ये ‘रश’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१५ मध्ये, तिने ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ६’ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आणि ती या शोची फायनलिस्ट देखील झाली होती. याशिवाय, सागरिका ‘बॉस: बाप ऑफ स्पेशल सर्व्हिसेस’ या वेब सिरीजमध्येही दिसली होती, ज्यामध्ये तिने एसीपी साक्षी रंजनची भूमिका खूप चांगल्या प्रकारे साकारली होती. तसेच आता चाहते अभिनेत्रीच्या नव्या चित्रपट ‘ललाट’ची प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.