Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZEE5 लवकरच घेऊन येत आहे “Maeri”; कुटुंब, न्याय आणि सूड दाखवणारी थरारक सिरीज!

सचिन दरेकर यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या सिरीज “Maeri” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही रिलीज ZEE5 घोषित केली असून, या थरारक सिरीज मध्ये अप्रतिम कलाकार झळकणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 29, 2024 | 05:14 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा सर्वात मोठा होम-ग्रोन व्हिडिओ स्ट्रिमिंग मंच तसेच विविध भाषीय स्टोरीटेलर ZEE5 ने आपल्या आगामी हिंदी ड्रामा सिरीज Maeri च्या ट्रेलरचा रिलीज केला आहे. सचिन दरेकर यांच्या झेनिथ पिक्चर्सची निर्मिती असलेला Maeri हा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा भावनिक थरारपट आहे. त्यामध्ये कुटुंबामधल्या गुंतागुंतीच्या नात्यांचा, तसेच अनेक गुप्त तथ्यांचा आणि व्यक्तीगत रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. Maeri मध्ये सई देवधर तारा देशपांडे नावाच्या धैर्यशील आईची भूमिका निभावत असून, सागर देशमुख यांनी त्यांच्या नवऱ्याची-हेमंत देशपांडेची भूमिका बजावली आहे, तन्वी मुंडलेने त्यांची साहसी मुलगी मनस्वी हिची भूमिका साकारली आहे. तर, चिन्मय मांडलेकर आपल्याला कणखर एसीपी खांडेकर म्हणून पडद्यावर दिसत आहे प्रेक्षकांना दिनांक 6 डिसेंबरपासून Maeri ZEE5 वर पहायला मिळणार आहे.

Maeri हा चित्रपट तारा देशपांडे नावाच्या आईच्या कथेभोवती फिरते. सबळ तरुणांच्या समुहाद्वारे निघृणपणे आक्रमण झालेल्या आपल्या मुलीसाठी म्हणजेच मनस्वीसाठी ती कणखरपणे उभी राहते. न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळू न शकल्यामुळे तारा शक्तीशाली गुन्हेगारांविरुध्द मोर्चा बांधण्यासाठी घातक मार्गावरुन मार्गक्रमण करु लागते. सूड घेण्यासाठी ती प्रत्येक स्त्रोत वापरते आणि जमेल तो प्रयत्न करते. कथा जस-जशी पुढे सरकते तसे ताराला आपल्या कुटुंबातल्या अराजकतेचा आणि निर्दयी पोलिस अधिकाऱ्याचा सामना करावा लागतो, त्याचप्रमाणे तिला आपल्या तात्विक मर्यादांना ओलांडावे लागते. प्रत्येक ट्विस्ट सोबत ताण वाढतो, अखेरीस शॉकिंग शेवट पहायला मिळतो. ताराच्या सूडाची तिला सर्वार्थाने किंमत मोजावी लागेल का? हे या कथेत पाहायला मिळणार आहे.

निर्माता आणि दिग्दर्शक सचिन दरेकर म्हणाले, “ZEE5 सोबत काम करणे ही अतिशय आकर्षक संधी आहे, कारण इथे अनेक प्रेक्षकांसमोर आपले मत मांडता येत असल्याने, जागतिक स्तर गाठणे शक्य होते. “Maeri” ही एक सूड कथा असून ती रहस्य, मानवी नातेसंबंध, व्यक्तीगत वादासारख्या पैलूंना एकत्र गुंफत आई, वडील आणि मुलीमधल्या बंधनावर लक्ष केंद्रित करते. यापैकी प्रत्येकजण त्याच्या स्वत:च्या तथ्यांसोबत संघर्ष करत आहे आणि आपण केलेल्या निवडीचे परिणाम भोगत आहे. Maeri केवळ सूडाबद्दल असलेली कथा नाही तर तिच्यामध्ये नितळ भावनांचा आंतर्भाव आहे ज्या नुकसान, प्रेम त्याचप्रमाणे गोष्टी तुमच्या विरुध्द गेल्यावर लढण्याचे समर्पण व्यक्त करतात. प्रेक्षक कथानकातले ट्विस्ट त्याचप्रमाणे त्यातील पात्रांच्या शक्तीशाली प्रवासाचा अनुभव करु शकतील याबद्दल मला अधिक उत्सुकता आहे.” असे त्यांनी सांगितले.

सलमान खानची बहीण अर्पिता खानने मुंबईत उघडले नवीन रेस्टॉरंट, चाहत्यांनी केले अभिनंदन!

सई देवधर आपला अनुभव सांगताना म्हणाल्या, “तारा देशपांडे हे पात्र माझ्यामते अतिशय संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे. एका हृदयद्रावक प्रसंगामुळे तारामधल्या आईला आपल्या मर्यादा पार कराव्या लागतात, न्यायासाठी असलेला लढा तिच्यासाठी तिचे सामर्थ्य तसेच तिच्यावरचे ओझे बनते. या सबळ कथानकाचा मी एक भाग असल्याचे आणि ताराच्या प्रवासाला सजीव करण्याचे मला अतिशय समाधान वाटते. प्रेक्षक आता हा शो पाहू शकतील, त्याच्यातल्या थरारक ट्विस्ट आणि सखोल भावनिक पदरांना ते समजून घेऊ शकतील. हे सर्व पाहण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. Maeri ही प्रत्येकाला साजेशी कथा आहे आणि ZEE5वर तिच्या रिलिजबद्दल मला अतिशय उत्कंठा वाटत आहे.” असे त्या म्हणाल्या आहेत.

Web Title: Zee5 is coming soon with maeri a thrilling series about family justice and revenge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 05:14 PM

Topics:  

  • entertainment
  • OTT Release

संबंधित बातम्या

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
1

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक
2

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज
3

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक
4

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.