Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prahaar Movie Song: सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित

Prahaar Movie Song: ‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ चित्रपटातील ‘तुझ में बसी मेरी जान’ हे रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. राजकुमार राव आणि वामिका गब्बीवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 09, 2026 | 02:20 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Prahaar Movie Song: बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या आगामी चित्रपटातील ‘तुझ में बसी मेरी जान’ हे रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात प्रेम, लग्नसोहळ्यातील आनंद आणि नात्यातील हळवे क्षण पाहायला मिळत आहेत.

टी-सीरिज प्रस्तुत या गाण्यात श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या सुरेल आवाजाची जादू अनुभवायला मिळते. संगीतकार प्रीतम यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे, तर अमिताभ भट्टाचार्य यांनी हिंदी गीताचे बोल लिहिले आहेत. मराठी गीतलेखनाची जबाबदारी अमेय दयाळ यांनी सांभाळली आहे. प्रेमातील आपुलकी, एकमेकांसोबत घालवलेले खास क्षण आणि नात्यातील भावनिक बंध या गाण्यातून सुंदरपणे मांडण्यात आले आहेत.

राजकुमार राव-वामिका गब्बीची रोमँटिक केमिस्ट्री

‘तुझ में बसी मेरी जान’ या गाण्यात राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या लग्नसोहळ्याची झलक पाहायला मिळते. एकमेकांकडे पाहताना चोरून दिलेले कटाक्ष, खोडकर क्षण आणि प्रेम व्यक्त करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांच्या नात्यातील गोडवा दिसून येतो. दोन्ही कलाकारांची केमिस्ट्री आणि श्रेया घोषाल-सोनू निगम यांचा सुरेल आवाज यामुळे गाण्याला खास रंगत आली आहे.

 

श्रेया घोषाल-सोनू निगम यांच्या आवाजाची जादू

या गाण्याबद्दल बोलताना श्रेया घोषाल यांनी सांगितलं की, ‘तुझ में बसी मेरी जान’ हे प्रेम, सहजीवन आणि नात्यातील छोट्या पण महत्त्वाच्या क्षणांचं सुंदर सेलिब्रेशन आहे. सोनू निगम यांच्यासोबत पुन्हा गाणं गाण्याचा अनुभव खास असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्यातील केमिस्ट्रीमुळे गाण्यातील भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त झाल्याचं त्यांनी सांगितलं.

सोनू निगम यांनीही या गाण्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रेमाच्या साध्या आणि सुंदर भावनेचा अनुभव देणारं हे गाणं असून, श्रेया घोषाल यांच्यासोबत पुन्हा काम करणं आनंददायी असल्याचं त्यांनी म्हटलं. दोन्ही गायकांच्या आवाजातील भावपूर्ण सादरीकरणामुळे या रोमँटिक गाण्याला वेगळीच उंची मिळाली आहे.

Tanushree Dutta: ‘त्यांच्या नावावर फुटेज..’, तनुश्री दत्ताच्या नाना पाटेकरांवरील वक्तव्याने नवा वाद; रोजलीन खानचा संताप, म्हणाली..

१६ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत दाखल होणार ‘प्रहार’

दिनेश विजान आणि मॅडॉक फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या ‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहेत. अविनाश अरुण धवरे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

‘तुझ में बसी मेरी जान’ हे गाणं सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झालं असून, त्याचा म्युझिक व्हिडीओ टी-सीरिजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.

Char Yaar Web Series: सई ताम्हणकर ते चंकी पांडे; ‘चार यार’मध्ये झळकणार दिग्गज कलाकार, रिलीज डेट जाहीर

Web Title: Prahaar movie song sonu nigam shreya ghoshal romantic song release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • entertainment
  • New Song
  • Shreya Ghoshal

संबंधित बातम्या

Gondhal Marathi Movie: ऑस्कर २०२७ मध्ये ऐतिहासिक झेप! होम्बळे फिल्म्सच्या माध्यमातून ‘गोंधळ’ चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार
1

Gondhal Marathi Movie: ऑस्कर २०२७ मध्ये ऐतिहासिक झेप! होम्बळे फिल्म्सच्या माध्यमातून ‘गोंधळ’ चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार

Tanushree Dutta: ‘त्यांच्या नावावर फुटेज..’, तनुश्री दत्ताच्या नाना पाटेकरांवरील वक्तव्याने नवा वाद; रोजलीन खानचा संताप, म्हणाली..
2

Tanushree Dutta: ‘त्यांच्या नावावर फुटेज..’, तनुश्री दत्ताच्या नाना पाटेकरांवरील वक्तव्याने नवा वाद; रोजलीन खानचा संताप, म्हणाली..

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?
3

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
4

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.