Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तुम्ही टीका करत राहा, आम्ही…”, निलेश साबळे- शरद उपाध्ये वादावर ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची पोस्ट

'चला हवा येऊ द्या' या टेलिव्हिजन शोवरून अभिनेता निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यात सध्या जोरदार वाद सुरु आहे. यावर अनेक मराठी सेलिब्रिटी निलेश साबळेच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आपली मत मांडताना दिसत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 06, 2025 | 04:14 PM
"तुम्ही टीका करत राहा, आम्ही...", निलेश साबळे- शरद उपाध्ये वादावर 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराची पोस्ट

"तुम्ही टीका करत राहा, आम्ही...", निलेश साबळे- शरद उपाध्ये वादावर 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराची पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

‘चला हवा येऊ द्या’ या टेलिव्हिजन कॉमेडी शोवरून अभिनेता निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यात सध्या जोरदार वाद सुरु आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘चला हवा येऊ द्या’चा दुसरा सीझन येणार आहे. या नव्या सीझनचं होस्टिंग निलेश साबळे करणार नसून अभिजित खांडकेकर करणार आहे. ‘चला हवा येऊ द्या २’मधून निलेश साबळेने एक्झिट घेतल्यानंतर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी निलेशवर डोक्यात हवा गेली, त्यामुळे झी मराठीने डच्चू दिला यांसह अनेक त्यांनी आरोप केले.

भारतातील सर्वात महागडा सिनेमा, १६०० कोटींचं बजेट; चित्रपटाचा निर्माता कोण?

राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्या टीकेवर निलेशने व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी निलेश साबळेच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आपली मत मांडताना दिसत आहेत. त्यानंतर आता ‘चला हवा येऊ द्या’मधील एका कलाकार पोस्टच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या काही एपिसोडमध्ये अभिनेता अभिषेक बारहाते- पाटील दिसला होता. त्यामध्ये त्याने किम जोंग उनची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना फार आवडली होती. आता शरद उपाध्ये- निलेश साबळेच्या वादात अभिषेकने उडी घेतली असून त्याने निलेश साबळेची बाजू घेतली आहे.

कपिल शर्माने पत्नीसोबत सुरू केला नवीन व्यवसाय, परदेशामध्ये केला श्रीगणेशा

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता अभिषेक बारहाते- पाटील काय म्हणाला?

प्रति
सन्मा.शरद उपाध्ये साहेब

आज तुमची एक पोस्ट वाचली.
डॉक्टर निलेश साबळे यांच्याबद्दलची ते डॉक्टर ज्यांच्यामुळे आमच्यासारख्या गावातल्या मुलांची स्वप्नं साकार झाली.त्या माणसाबद्दल वाईट, अपमानास्पद बोललं गेलं.

“डोक्यात हवा गेलीय”,
“याला आपणच मोठं केलं…”
“सगळा अभिनय फक्त स्वतःचा शोभा वाढवायला…”
असं किती काही वाचायला मिळालं आणि खरं सांगायचं, तर राग आला. पण त्याहून जास्त खंत वाटली.
कारण तुम्ही टीका केली त्या माणसावर, ज्यांनी लोकांमध्ये चेहरा नसलेल्या, आवाज नसलेल्या, नाव नसलेल्या मुलांना नाव दिलं, आवाज दिला, आणि स्टेज दिला.

हो, मी गावाकडचा आहे.
शुद्ध भाषेचा अभाव बोलण्याची भीती होती. अभिनय माहित नसलेला पण तेव्हा कोणीतरी होता ज्याने आमच्यासारख्या गावठीवर विश्वास ठेवला. आम्ही काहीतरी करू शकतो, हे पहिल्यांदा दाखवून दिलं.

डॉक्टर निलेश साबळे आमचे मार्गदर्शक, आमची ओळख.

ज्या शोबद्दल आपण बोलला चला हवा येऊ द्या विषयी
शून्य जाहिरातीतून, शून्य गॉसिपमध्ये राहून… फक्त कामावर विश्वास ठेवत तो शो अविरतपणे चालवला तो साबळे सरांनी आणि बघता बघता,
तो कार्यक्रम त्याने १० वर्षे टिकला.
लोक मराठी शो बदलून पाहायचे,
हिंदी कलाकार मराठीत यायला भाग पडले.पहिला मराठी शो ज्याने हिंदी कलाकार मराठी स्टेज वर आणले.आणि एक दिवस असा आला की –
‘चला हवा येऊ द्या शो’ फक्त मुंबईपुरती मर्यादित गोष्ट राहिली नाही.

कोणी तरी म्हणालं – “स्टारडम डोक्यात गेलंय.”
हो, गेलंय कदाचित –
पण ते डोक्यात गेलेलं ‘हवा’ नाही –
तर अनुभव, संघर्ष, आणि हजारोंच्या पाठीशी उभं राहिलेलं आत्मभान आहे.

आमच्यासारख्या पोरांना लोक विचारायचे – “तू कुठून आलास?”
आज विचारतात – “तू त्या शोमध्ये होता ना?”
ही ओळख फुकट मिळत नाही –
ही ओळख मिळवून द्यायला कोणीतरी आयुष्य घालवतं लागतं.

आणि म्हणूनच,
कोणीही काहीही बोलेल, तरी सत्य बदलत नाही.
ज्यांनी निर्माण केलं, त्यांचं योगदान काही पोस्टने मिटत नाही.

हे सरांचं कौतुक नाही, हे आम्हा सर्वांचं उत्तर आहे.
कारण जिथे आमचा आवाज थांबतो,
तिथे त्यांनी आम्हाला बोलायला शिकवलं.
आणि आज कोणी त्यांच्यावर बोट दाखवत असेल,
तर आम्ही शंभर आवाजांनी त्यांचं नाव पुन्हा पुन्हा उच्चारू.

आमचं शिक्षण, आमचा आत्मविश्वास, आमचं ओळख –
किती मोलाचं असतं हे तुम्हाला समजणार नाही.
कारण तुमचं सगळं काही तयार होतं.
आमचं तर त्यांच्यामुळे सुरू झालं.

तुम्ही टीका करत राहा, आम्ही आदर करत राहू.
कारण तुम्ही नाव घेतलं, आणि आम्ही नाव कमावलं – त्यांच्या बरोबर उभं राहून.

एक गावातला मुलगा
(जो स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलाय-एका माणसामुळे)

 

Web Title: Chala hava yeu dya actor abhishek barhate patil post shared on nilesh sable and sharad upadhye controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 04:14 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi serial update
  • marathi show
  • nilesh sable
  • Television Shows

संबंधित बातम्या

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
1

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
2

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

पारू मालिकेत येणार मोठा ट्विस्ट! श्रीकांत घरच्यांसमोर उघड करणार का आदित्य-पारूच्या लग्नाचं सत्य?
3

पारू मालिकेत येणार मोठा ट्विस्ट! श्रीकांत घरच्यांसमोर उघड करणार का आदित्य-पारूच्या लग्नाचं सत्य?

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
4

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.