(फोटो सौजन्य - x अकाउंट)
आपल्या विनोदाने सर्वांना हसवणारा कपिल शर्मा आता अन्न आणि पेय व्यवसायात प्रवेश करत आहे. त्याने पत्नी गिन्नी चतरथसह कॅनडामध्ये ‘द केप्स कॅफे’ उघडले आहे. या कॅफेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच हा कॅफे खूपच सुंदर आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या या कॅफेची सर्वत्र चर्चा होत आहे.
लोक कपिल शर्माचे अभिनंदन करत आहेत
सोशल मीडियावर कपिल शर्माच्या कॅफेचे फोटो आता व्हायरल होत आहेत. कॅफेची झलक या फोटो आणि व्हिडीओमध्ये दिसत आहे. कपिल शर्माचे चाहते त्यांना नवीन व्यवसायासाठी अभिनंदन करत आहेत. कॅफेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात झाले. कॅफेच्या आत काही लोक असल्याचे फोटोमध्ये दिसून येत आहे. ते लोक कॅफेमध्ये खरेदी करण्यासाठी रांगेत उभे आहेत. कॅफेचा पुढचा भाग हा संपूर्ण काचेचा आहे. गेट गुलाबी फुलांनी सजवलेला आहे.
‘रक्ताने माखलेला चेहरा अन्…’, रणवीर सिंगच्या ‘Dhurandhar’ मधील खतरनाक लूकने वेधले लक्ष
सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो
‘द केप्स कॅफे’च्या इन्स्टाग्राम हँडलवरून फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यासोबत एक फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘प्रतीक्षा संपली. दरवाजे उघडले आहेत. ‘द केप्स कॅफे’मध्ये आपलं स्वागत आहे.’ असे लिहून ही पोस्ट शेअर केली आहे. कपिल शर्मा आणि गिन्नी दोघांनीही त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर या कॅफेचा व्हिडीओ शेअर केला आणि त्यांनी ग्राहकांचे आभार मानले.
‘Tanvi The Great’ला राष्ट्रीय संरक्षण अकादमीने दिले स्टँडिंग ओव्हेशन, दिग्दर्शक अनुपम खेर झाले भावुक
कपिल शर्माचे लग्न
कपिल शर्माने १२ डिसेंबर २०१८ रोजी त्याची प्रेयसी गिन्नी चतरथशी लग्न केले. कपिल शर्माला दोन मुले आहेत. २०१९ मध्ये त्यांना एक मुलगी आणि २०२१ मध्ये एक मुलगा झाला. त्यांच्या मुलाचे नाव त्रिशान आहे. मुलीचे नाव अनयरा आहे. दोघेही एक उत्कृष्ट कपल आणि आई वडील आहेत.
कपिल शर्माचे वर्कफ्रंट
कपिल शर्मा फूड बिझनेसमध्ये सामील झाला असला तरी तो पडद्यावर आपली उपस्थिती कायम ठेवेल. सध्या कपिल शर्माचा शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. तो लवकरच ‘किस किस को प्यार करूं २’ आणि ‘दादी की शादी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘किस किस को प्यार करूं २’ हा त्याच्या पहिल्या चित्रपट ‘किस किस को प्यार करूं’चा सिक्वेल आहे.