शंभुरायांची शौर्यगाथा मांडणारा 'छावा' आता OTT वर, सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कधीपासून आणि कुठे पाहता येणार ?
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. देशासह परदेशामध्ये सर्वाधिक कमाई करत लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट आता ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ५० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सध्या तरी हा चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये अव्वल ठरला आहे. चला तर जाणून घेऊया, विकी कौशल स्टारर ‘छावा’ चित्रपट कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार आहे ? आणि प्रेक्षकांना हा चित्रपट केव्हापासून पाहता येणार?
अॅटलीच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर रिलीज; अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाले रिटर्न गिफ्ट!
१४ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेला ‘छावा’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन ५० पेक्षा अधिक दिवस झाले. चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शनही चांगले आहे. ‘छावा’चे हिंदी व्हर्जन हिट झाल्यानंतर तामिळ भाषेमध्येही चित्रपट रीलिज करण्यात आला. आता हा सिनेमा या आठवड्यात OTT वर रीलिज होण्यासाठी सज्ज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट ११ एप्रिलपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल. दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाने भारतामध्ये ५९८. ५० कोटींची कमाई केलेली आहे, तर जगभरात चित्रपटाने ८०१. ३५ कोटींची कमाई केलेली आहे. यावर्षीचा कोणताही चित्रपट ‘छावा’ चित्रपटाच्या कमाईला स्पर्धा करू शकलेला नाही. सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाकडून अपेक्षा होत्या, पण भाईजानचा चित्रपट तसं करण्यात अयशस्वी ठरलेला आहे.
शाहरुख खान फॅमिलीसोबत नव्या घरात शिफ्ट झाला, ‘मन्नत’पेक्षा अर्ध आहे किंग खानचं नवीन अपार्टमेंट
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला चित्रपटप्रेमींनी खूप प्रेम दिलं. ‘छावा’ 11 एप्रिल रोजी (Chhaava OTT Release Date) ‘नेटफ्लिक्स’ (Netflix)या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. दरम्यान, अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. ‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याने साकारलेल्या भूमिकेला देशासह परदेशातून प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे. त्याचा अभिनय पाहून विकी कौशलचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. महाराणी येसूबाईंची भूमिका ही लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे, तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात संतोष जुवेकर, शुंभकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहे. सर्वच कलाकारांचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक कंपनीने केली आहे.
‘L2 Empuran’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट, फक्त नऊ दिवसांत बनवला रेकॉर्ड!