अशोक मामांच्या विरोधात भैरवीचा नवा डाव, इरा- ईशानची कशी मिळवणार कस्टडी?
कलर्स मराठीवरील ‘अशोक मा.मा.’ मालिकेत सध्या अशोक मामा नोकरी मिळविण्याची धडपड करीत आहेत. नोकरीसाठी सुरु असलेली ही वणवण कधी संपणार याचीच प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे, अशोक मामांच्या विरोधात भैरवी नवा डाव आखते आहे. भैरवीला कळत की, इरा आणि ईशान सोसायटीमध्ये पुस्तके विकत होती आणि ह्यावरूनच तिचा तिळपापड होतो आणि ती तिच्या बाबांना गळ घालते की तिला मुलांना आणण्यासाठी मदत करा. भैरवी घरी जाते सांगते की ती मुलांना घेऊन जाणार. मामा त्याला सहमती दर्शवतात.
“काही कथा संपत नाहीत, त्या आजून पुढे जातात…”, ॲक्शनपॅक्ड ‘गौरीशंकर’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
इरा आणि ईशान मात्र मामांसोबत राहतात आणि संयमी भैरवी सोबत तिच्याकडे जाते. पण, भैरवीला मात्र इरा आणि ईशानची देखील कस्टडी हवी आहे आणि त्यामुळेच ती अनिशला लग्नासाठीची विचारणा करते. आता अनिश भैरवीशी लग्नासाठी तयार होईल का ? भैरवी मुलांची कस्टडी मिळवू शकेल का ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘अशोक मा.मा.’ मालिकेचा आजचा एपिसोड पाहावा लागणार आहे.
अशोक मामांना बऱ्याचदा भैरवीवर संशय देखील येतो, की नक्की हीच काहीतरी डाव टाकत आहे. कारण याआधी मुलांची कस्टडी मिळविण्यासाठी भैरवीने अनेक प्रयत्न केले आहेत. संयमी भैरवीकडे आहे आणि इरा ईशान मामांकडे. एकमेकांपासून दुरावल्याने तिघांनाही एकमेकांची आठवण येते आहे. इरा मामांना मोबाईलवर व्हिडिओ कसा करायचा ते शिकवते आणि मामा संयमीला घरी परत ये असा व्हिडिओ पाठवतात. त्यांचा व्हिडिओ बघून संयमी परत घरी परत येते. भैरवी आता दुसरा प्लॅन करायचं ठरवते त्यासाठी वकिलांना जाऊन भेटते. भैरवी अनिशला भेटते आणि सांगते की मामांच्या विरोधात मुलांना आणण्यासाठी मला मदत कर.. आपण दोघं मिळून हे करूया.
Oscar 2025 मध्ये हृतिक रोशनचा जलवा; १७ वर्षे जुन्या ‘या’ चित्रपटाची होणार स्पेशल स्क्रिनिंग
दुसरीकडे, मामा अजूनही नोकरी शोधत आहेत पण मिळत नाहीये. पण तरीदेखील घरी परतल्यावर अशोक मा. मा मुलांसोबतछान रमले आहेत, मामा मुलांना जुन्या गोष्टी सांगत आहेत. मामा मुलांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत वेळ पडली तर त्यांना शिक्षा देखील आहेत कारण त्यांच्यासाठी शिस्त म्हणजे शिस्त नाही का ? मामा आणि मुलांमधील काही गोड क्षण, त्यांच्यातील बॉण्डिंग देखील पाहायला मिळत आहे. तसेच फुलराणी आणि मामा मधील जुगलबंदी मालिकेत बघायला मिळत आहे. हे सगळं सुरु असताना भैरवी वेगवेगळे कट रचते आहे कि कशी मुलांना मामांपासून तोडेल.
आता अशोक मा. मां चे प्रयत्न, प्रेम त्यांची धडपड यशस्वी होईल कि, भैरवीचे डाव… हे लवकरच कळेल. तेव्हा जाणून घेण्यासाठी बघत राहा अशोक मा.मा. दररोज रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर.