फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ॲक्शनपॅक्ड आणि टाळीबाज संवाद असलेल्या गौरीशंकर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. अन्यायाच्या बदल्याची, शोधाची, थरारक, रंजक अशी कहाणी या चित्रपटातून पहायला मिळणार असून, २८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये दाखल होणार आहे.
Oscar 2025 मध्ये हृतिक रोशनचा जलवा; १७ वर्षे जुन्या ‘या’ चित्रपटाची होणार स्पेशल स्क्रिनिंग
मुव्हीरूट प्रॉडक्सन्सची निर्मिती असलेल्या “गौरीशंकर” या चित्रपटाची निर्मिती विशाल प्रदीप संपत यांनी केली आहे. ऑरेंज प्रॉडक्शन्स चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. हरेकृष्ण गौडा यांची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे. चित्रपटात हरेकृष्ण गौडा, कविता वसानी दक्षिणा राठोड, राहुल जगताप, सुशील भोसले, संकेत कोळंबकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
प्रशांत आणि निशांत यांनी संगीत दिग्दर्शन, रोशन खडगी यांनी छायांकन, संकेत कोळंबकर यांनी गीतलेखन, अमित जावळकर यांनी संकलन, राशिद मेहता यांनी ॲक्शन, अमित चिंचघरकर यांनी कला दिग्दर्शन, मेकअप नितिन दांडेकर, धनश्री साळेकर यांनी वेशभूषेची जबाबदारी निभावली असून कार्यकारी निर्माता म्हणून सिद्धेश आयरे यांनी काम पाहिले आहे.
२४ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह
प्रेम, अन्याय, बदला, शोध असं या चित्रपटाचं आशयसूत्र असल्याचं, कथानक न उलगडता ॲक्शनवर भर देण्यात आल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्याशिवाय उत्तम लोकेशन्सवरचे रोमँटिक प्रसंगही त्यात आहेत. त्यामुळे अत्यंत रांगडं व्यक्तिमत्त्व असलेल्या नायकाच्या आयुष्यात काय घडलं आहे, त्याचा शोध कशा पद्धतीनं घेतो याची उत्सुकता या ट्रेलरनं निर्माण केली आहे. उत्तम दर्जाचे ॲक्शन सिक्वेन्स या ट्रेलरमध्ये दिसतात. त्यामुळे दर्जेदार ॲक्शनपटाची मराठीतील उणीव भरून निघण्याची मराठी प्रेक्षकांची अपेक्षा वाढली आहे. हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.