Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सानिका – सरकारच्या आयुष्यात नवं संकट येणार, “लय आवडतेस तू मला”मध्ये येणार नवा ट्वीस्ट

साहेबराव आपल्या मुलीचा जीव खरंच घेतील ? सरकार - सानिका यातून कसे बाहेर पडतील ? आप्पासाहेब आणि कळशी गावं या दोघांना गावात येऊ देतील ? प्रश्नांचं उत्तरं प्रेक्षकांना "लय आवडतेस तू मला" मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मिळेल.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 04, 2025 | 04:16 PM
Tu Lai Aavdtes Mala Serial Latest News

Tu Lai Aavdtes Mala Serial Latest News

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येकाची प्रेमकथा ही सरळ, सोपी नसते नाही का ? बऱ्याचदा आपला जीव ज्या माणसावर जडला आहे त्याच्यासोबत लग्न गाठ बांधताना, सहजीवनाचा प्रवास अगदी सोपा होत जातो कुठलेही अडथळे न येता, कुठल्याही विरोधाला सामोरं न जाता अगदी निर्विघ्नपणे पार पडतो. पण काही लव्ह स्टोरी अश्या असतात ज्यांना अग्निदिव्यातून जावं लागतं. रोज नवी संकटं, नवी आव्हानं आणि नवे पेच. इतक्या कठीण काळात देखील प्रेम टिकून राहणं आणि एकमेकांच्या साथीने ते अग्निदिव्य पार करणं म्हणजे भारीच नाही का? अगदी तसंच झालं आहे आपल्या सरकार – सानिकाचं…सुरुवाती पासूनच अशक्य वाटणारी प्रेमकथा अखेर सत्यात उतरली.

Sunbai Lai Bhari: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला सबलीकरणावर आधारित चित्रपटाचं पोस्टर लाँच, केव्हापासून होणार शुटिंगला सुरुवात ?

सरकार सानिका देखील अनेक कट – कारस्थानाला सामोरे गेले. सई, सर्वेश आणि पंकजा यांनी सरकार सानिकामध्ये दुरावा आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्यांना वेगळं करण्यासाठी अनेक प्लॅन केले… परंतु खऱ्या प्रेमापुढे त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले. पण आता खरी परीक्षा सुरु झाली असं म्हणायला हरकत नाही. साहेबरावांसमोर आता सरकारचे सत्य आल्याने ते सरकार – सानिकाच्या लग्नाच्या काय तर दोघांच्या प्रेमाच्या देखील विरोधात गेले आहेत. दोन गावामधील वैर पूर्णतः संपून जावे अशी एकीकडे सानिकाची इच्छा तिने सरकारकडे व्यक्त केली तर दुसरीकडे साहेबराव याच वैरामुळे दोघांचा जीव घेण्यासाठी देखील मागे पुढे बघणार नाही असे दिसून येते आहे. येत्या मालिकाच्या भागांमध्ये साहेबरावांचा राग टोक गाठणार आहे, कारण जिवंत सानिकाचं ते श्राद्ध घालणार आहेत. आणि हे सानिकाला कळल्यावर पुढे नक्की काय होईल ? ती काय निर्णय घेईल ? हे येत्या भागांमध्ये कळेलच. तेव्हा बघत राहा # लय आवडतेस तू मला दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर !

विश्वास की परिस्थिती ? ‘द प्रेयर’ शॉर्ट फिल्ममधून उलगडणार मानवी मनाची अवस्था

सरकार सानिकाचे लग्न पार पडत असताना साहेबराव देवळात येतात त्यांना बघताच हल्ला होण्याअगोदरच दोघे तिथून पळून जातात. आता साहेबराव दोघांच्या शोधात आहेत, तर तिथे पंकजा साहेबरावांना भडकावते तुझी पोरीने कळशीच्या पोरासोबत लग्न केल म्हणजे काय? शोना आणि विभा जंगलात सरकार सानिका यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी डेकोरेशन करतात. तर तिथे, साहेबराव सानिका सरकारला जिवंत किंवा मृत पकडून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर करतात. साहेबरावांचे म्हणणे आहे की सानिका सरकार यांना शिक्षा पोलीस नाही मी स्वतः देणार. सानिका साहेबरावने दिलेली जाहिरात बघते. एकीकडे सानिका सरकार त्यांच्या सुरू होणाऱ्या नवीन संसाराचे स्वप्न बघत आहेत तर दुसरीकडे सावित्रीचा विरोध असूनही साहेबराव सानिकाचं श्राद्ध घालण्याचा निर्णय घेतात.

साहेबराव आपल्या मुलीचा जीव खरंच घेतील ? सरकार – सानिका यातून कसे बाहेर पडतील ? आप्पासाहेब आणि कळशी गावं या दोघांना गावात येऊ देतील ? जाणून घेण्यासाठी बघत राहा # लय आवडतेस तू मला दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर !

Web Title: Colors marathi serial tu lai aavdtes mala serial latest update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • Entertainment News
  • marathi serial update

संबंधित बातम्या

ठरलं तर मग!  स्टार प्रवाहवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत
1

ठरलं तर मग! स्टार प्रवाहवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

Nandurbar Crime: आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला
2

Nandurbar Crime: आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला

Tejaswini Lonari चा हिरव्याकंच साडीमधील लुक, लग्नानंतर नववधूचा Glow दिसतोय कमालीचा आकर्षक
3

Tejaswini Lonari चा हिरव्याकंच साडीमधील लुक, लग्नानंतर नववधूचा Glow दिसतोय कमालीचा आकर्षक

‘पारू’फेम अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक, सून अमृताने सोशल मीडियावर केले शेअर
4

‘पारू’फेम अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक, सून अमृताने सोशल मीडियावर केले शेअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.