Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DADA The Sourav Ganguly Story: ‘दादा’च्या भूमिकेत राजकुमार राव; सौरव गांगुली बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित, रिलीज डेटही आली समोर

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज आपला ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. हा विशेष प्रसंग साजरा करण्यासाठी, निर्मात्यांनी त्याच्या बायोपिकमधील अभिनेता राजकुमार रावचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 08, 2026 | 11:22 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या आयुष्यावर आधारित ‘दादा – द सौरव गांगुली स्टोरी’ या बहुप्रतीक्षित बायोपिकचा फर्स्ट लूक अखेर प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच पोस्टरमध्ये अभिनेता राजकुमार राव सौरव गांगुलींच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण पुन्हा साकारताना दिसत असून, त्याच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

पोस्टरमध्ये राजकुमार रावचा लूक तरुण सौरव गांगुलींची आठवण करून देणारा आहे. त्याची हेअरस्टाईल, चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोली यावर विशेष मेहनत घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येते. निर्मात्यांनी फर्स्ट लूकसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली असून, ‘दादा – द सौरव गांगुली स्टोरी’ १४ मे २०२७ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सौरव गांगुली यांच्या बायोपिकची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. सुरुवातीला त्यांच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांची नावे चर्चेत होती. अखेर ही महत्त्वाची भूमिका राजकुमार राव साकारणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावर्षी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, आता त्याचा पहिला अधिकृत लूकही समोर आला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवाने यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. टी-सीरिज, डीबीएल आणि लव्ह फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

चित्रपटात सौरव गांगुली यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे, भारतीय संघाच्या कर्णधारपदापर्यंतचा त्यांचा प्रवास, आलेले संघर्ष आणि भारतीय क्रिकेटमध्ये दिलेले मोलाचे योगदान उलगडण्यात येणार आहे.


Mismatched Season 4: ‘मिसमॅच्ड’चा शेवटचा अध्याय सुरू; चौथ्या आणि अंतिम सीझनच्या शूटिंगदरम्यान ऋषी-डिंपल झाले भावूक

फर्स्ट लूक पोस्टरमध्ये १३ जुलै २००२ रोजीच्या ऐतिहासिक क्षणाची झलक दाखवण्यात आली आहे. नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर सौरव गांगुली यांनी लॉर्ड्सच्या बाल्कनीत जर्सी हवेत फडकावत केलेला जल्लोष क्रिकेट इतिहासातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. त्यावेळी त्यांच्या या कृतीची मोठी चर्चा झाली होती. पुढे हा क्षण भारतीय क्रिकेटच्या बदललेल्या मानसिकतेचे आणि नव्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरला.

राजकुमार रावच्या दमदार लूकमुळे आणि सौरव गांगुलींच्या प्रेरणादायी प्रवासामुळे ‘दादा – द सौरव गांगुली स्टोरी’ हा चित्रपट क्रिकेटप्रेमींसह चित्रपट रसिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण करत आहे.

Akanksha Chamola: गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटानंतर आकांक्षा चमोला दुसरं लग्न करणार? भविष्यातील योजनांबाबत केला मोठा खुलासा

या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला असून राजकुमार रावने पहिला लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Web Title: Dada the sourav ganguly story first look unveiled rajkummar rao steps into sourav gangulys shoes release date announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Hindi Movie
  • rajkumar rao
  • Saurabh Ganguly

संबंधित बातम्या

सस्पेन्स, थरार अन् रहस्याचा संगम! ‘राव बहादुर’चा ट्रेलर चर्चेत,सत्यदेवच्या शाही लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष
1

सस्पेन्स, थरार अन् रहस्याचा संगम! ‘राव बहादुर’चा ट्रेलर चर्चेत,सत्यदेवच्या शाही लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.