(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
वीकेंड नंतरही ‘दशावतार’ चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. या चित्रपटाने ४ दिवसांत जोरदार कमाई केली आहे. कोकणातील लोककलेशी निगडीत असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. दशावतार शुक्रवारी. १२ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने सलग तीन दिवस कोटींमध्ये कमाई केली. आठवड्याच्या पहिल्यादिवशी सोमवारी या चित्रपटाने १ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ‘दशावतार’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर हाऊसफुल केले आहेत. दशावतार चित्रपटाने पहिल्या आठवड्यात आपली ताकद दाखवून असून या चित्रपटाने ४ दिवसांत एकूण ६.२३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तसेच ‘दशावतार’ हा चित्रपट एक सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री चित्रपट असून प्रेक्षक त्याला भरभरून प्रेम देत आहेत.
‘एक गई तो दूसरी आई…’, कोण आहे हार्दिक पंड्याची नवीन प्रेयसी? एका फोटोने उघड केले रहस्य
दशावतार बॉक्स ऑफिसवर गाजतोय!
दशावतार चित्रपटाने तीन दिवसांत जगभरात तब्बल ५. २२ कोटी रूपयांची कमाई केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, चित्रपटाने सोमवारी तब्बल १ कोटी एक लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने ४ दिवसांत एकूण ६.२३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज बघायला मिळत आहेत. हा चित्रपट कोकणातील लोककलेवर आधारित आहे.
का गाजतोय ‘दशावतार’?
कोकणातील दशावतार लोककला यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अनुभवी कलाकार असून या चित्रपटाला लोकांनी प्रचंड सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत सैराट सारख्या सगळ्यात जास्त कमाई केलेल्या मराठी चित्रपटाचा रेकॉर्ड मोडेल का, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
दिलीप प्रभावळकर बाबुली मेस्त्री या भूमिकेत
यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री ही भूमिका केली आहे. ‘दशावतार’चं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं, तेव्हापासून या चित्रपटाची सिनेविश्वात चर्चा होती. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.