Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026 : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका

या बजेटमध्ये शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग तसेच तरुणांसाठी कोणतीही ठोस व दिलासा देणारी तरतूद करण्यात आलेली नाही, अशी तीव्र टीका खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 01, 2026 | 09:37 PM
Budget 2026 : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका
Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प
  • खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची टीका
धाराशिव : आज रविवारी 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा पूर्णतः महाराष्ट्रविरोधी असून सामान्य जनतेच्या अपेक्षांचा घोर अपमान करणारा आहे. या बजेटमध्ये शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग तसेच तरुणांसाठी कोणतीही ठोस व दिलासा देणारी तरतूद करण्यात आलेली नाही, अशी तीव्र टीका खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केली.

महाराष्ट्राने देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले असतानाही केंद्र सरकारकडून राज्याला पुन्हा एकदा सापत्न वागणूक देण्यात आली आहे. मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग व रोजगारनिर्मितीसाठी कोणतीही विशेष तरतूद न केल्याने केंद्राचा महाराष्ट्राबाबतचा दुजाभाव स्पष्ट होत आहे.

Budget 2026: धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अर्थसंकल्पात पूर्णतः मौन बाळगण्यात आले असून वाढती महागाई रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी योजना जाहीर करण्यात आलेली नाही. शिक्षण, आरोग्य व सामाजिक न्यायाच्या योजनांमध्ये कपात करून सरकारने गरीब व वंचित घटकांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे, असेही राजेनिंबाळकर म्हणाले.

हा अर्थसंकल्प फक्त मोठ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांपासून केंद्र सरकार पूर्णतः दूर गेले आहे. या जनविरोधी बजेटचा आम्ही तीव्र निषेध करीत असून, महाराष्ट्राच्या हक्कासाठी संसदेत आणि रस्त्यावर संघर्ष करू, असा इशारा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिला आहे.

शेतकरी व गोरगरिबांची थट्टा करणारा फसवा व दिशाभूल करणारा केंद्रीय अर्थसंकल्प :ॲड. रेवण भोसले

जुन्याच योजनांना नवी नावे देऊन सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘जुनीच दारू नव्या बाटलीत’ असल्याची तीव्र टीका समाजवादी नेते ॲड. रेवण भोसले यांनी केली. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीबाबत तसेच हमीभावाबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ असून सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बगल देणारा, गरीबविरोधी आणि दिशाभूल करणारा आहे, असे ते म्हणाले.

वाढती बेरोजगारी आणि गगनाला भिडलेली महागाई कमी करण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. हा अर्थसंकल्प केवळ मोठ्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी असून शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे. काही राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांची खैरात वाटणारा हा अर्थसंकल्प असल्याचा आरोपही ॲड. भोसले यांनी केला.

महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात खोटी आश्वासने देऊन केवळ स्वप्ने दाखवण्यात आली असून केंद्र सरकारच्या या धोरणांचे समर्थन महायुतीचे पुढारी इमाने-इतबारे करत असल्याची टीकाही त्यांनी केली. सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी तसेच कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठराविक उद्योगपतींचे उखळ पांढरे करण्यासाठीच केंद्र सरकारने हा अर्थसंकल्प सादर केला असल्याचे ॲड. रेवण भोसले यांनी स्पष्ट केले.

Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली

 

Web Title: Budget 2026 budget that leaves farmers in the lurch mp omraje nimbalkars venomous criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mp Omraje Nimbalkar

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.