Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिसाद, अमेरिकन कंटेंट क्रिएटर्सकडून भरभरून कौतुक

अमेरिकेतील 'अवर स्टुपिड रिॲक्शन' या लोकप्रिय यूट्यूब कंटेंट क्रिएटर्सनी ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाच्या फर्स्ट लूकवर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाचा सकारात्मक पद्धतीने त्यांनी आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 08, 2025 | 07:42 PM
‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिसाद, अमेरिकन कंटेंट क्रिएटर्सकडून भरभरून कौतुक

‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिसाद, अमेरिकन कंटेंट क्रिएटर्सकडून भरभरून कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपट ‘दशावतार’चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर आता या भव्य चित्रपटाबाबतची चर्चा भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुरू झाली आहे. अमेरिकेतील ‘अवर स्टुपिड रिॲक्शन’ या लोकप्रिय यूट्यूब कंटेंट क्रिएटर्सनी ‘दशावतार’च्या फर्स्ट लूकवर प्रतिक्रिया देत, या चित्रपटाचा सकारात्मक पद्धतीने आढावा घेतला आहे. त्यांनी टीझरमधील दृश्यसौंदर्य, भव्य सेट्स, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि संकल्पनेचं विशेष कौतुक केलं आहे.

अमेय खोपकरच्या लेकाचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, ‘येरे येरे पैसा ३’ मधलं ‘उडत गेला सोन्या’ थेट हृदयाला भिडणारं गाणं प्रदर्शित

जगभरातील चित्रपटांविषयी सांगोपांग चर्चा करणारे अमेरिकेतील प्रसिद्ध समीक्षक/कंटेंट क्रिएटर कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल यांनी म्हटलं आहे की, “हा टीझर एखाद्या हॉलिवूड दर्जाच्या पौराणिक चित्रपटासारखा भासत आहे. मराठी चित्रपट अशा पातळीवर बनत असल्याचे पाहून खूप आनंद झाला.” सध्या या टीझरचे रिॲक्शन व्हिडिओज सर्वत्र व्हायरल होत असून ‘दशावतार’बद्दलची उत्सुकता मर्यादित प्रेक्षकांपुरती न राहाता, आता ग्लोबल ऑडियन्सपर्यंत पोहोचत आहे. कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल यांच्या कार्यक्रमात चर्चिला जाणारा ‘दशावतार’ हा पहिलाच मराठी आणि किंबहुना पहिला भारतीय प्रादेशिक चित्रपट असावा. मराठी भाषा आपला अटकेपार झेंडा मिरवत असतानाच मराठी चित्रपटदेखिल आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवत आहे, ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद बाब आहे.

“कुठल्याच देवळात जाणार नाही असं ठरवलं पण…”, मिलिंद गवळींनी सांगितला शिर्डीच्या साई मंदिरातील अनुभव

झी स्टुडियोज् प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित “दशावतार” हा चित्रपट कोकणातील अद्भुत निसर्ग, तिथल्या रूढीपरंपरा, मान्यता, लोककला यांचं मनोरम्य दर्शन घडवणारा आणि तितकीच त्याला गूढ, उत्कंठावर्धक, वेगवान, थरारकथेची जोड असलेला हा चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर यांची या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका असून या चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. तर चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे असून कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर दशावतार चित्रपटाची बांधणी करण्यात आली आहे. येत्या १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Dashavatar marathi movie first look praised by american content creators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 07:42 PM

Topics:  

  • marathi movie

संबंधित बातम्या

‘बिन लग्नाची गोष्ट’साठी प्रिया-उमेशची निवड कशी झाली?  दिग्दर्शक आदित्य इंगळेंनी सांगितली इनसाईड स्टोरी!
1

‘बिन लग्नाची गोष्ट’साठी प्रिया-उमेशची निवड कशी झाली? दिग्दर्शक आदित्य इंगळेंनी सांगितली इनसाईड स्टोरी!

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटातून उलगडणार गोड प्रेमाची गोष्ट, श्रमेश बेटकर दिसणार खास भूमिकेत
2

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटातून उलगडणार गोड प्रेमाची गोष्ट, श्रमेश बेटकर दिसणार खास भूमिकेत

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी
3

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
4

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.