फोटो सौजन्य – X
‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटात दिसलेली साक्षी मलिकचा राघव जुयालसोबतचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये तिच्या आणि राघवमध्ये थोडीशी भांडण होताना दिसत आहे. साक्षी रागात राघवचे केस ओढते, तर राघव तिला थप्पडही मारतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर दोघांमधील भांडणाची बरीच चर्चा रंगली होती आणि आता साक्षीने स्वतः या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
साक्षीने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘मित्रांनो, हे फक्त एका अभिनय सराव सत्रातील एक दृश्य आहे. कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. फक्त ४ कलाकार त्यांच्या अभिनयावर काम करत आहेत. आशा आहे की तुम्हाला समजेल.’ राघवनेही इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, ‘मित्रांनो, हा फक्त आमच्या सीन प्रॅक्टिसचा व्हिडिओ होता. कृपया ते खरे मानू नका. या व्हिडीओमध्ये जो दिसत असलेले हे फक्त एक चांगला अभिनेता आणि डान्सर बनण्याचा सराव आहे.’
Slap-Kalesh b/w Raghav Juyal and Sakshi Malik
pic.twitter.com/8JlmQrJXzm— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 8, 2025
साक्षी अरमान मलिकच्या वहम आणि विशाल मिश्रा आणि श्रेया घोषालच्या मुलाकत सारख्या म्युझिक व्हिडिओंमध्येही चमकताना दिसली होती. २०२३ मध्ये तिने “ड्राय डे” चित्रपटात चुन्नीबाईची भूमिका केली होती. तिचे इंस्टाग्रामवर ७.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
राघव जुयालबद्दल सांगायचे झाले तर, त्याने डान्स रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स ३ मध्ये स्पर्धक म्हणून त्याने सुरुवात केली होती. त्याच्या विशिष्ट स्लो-मोशन डान्स स्टाईलने त्याला ओळख मिळाली. शोमध्ये सेकंड रनर-अप झाल्यानंतर, त्याने होस्टिंग तसेच कोरिओग्राफर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अलीकडेच, तो करण जोहरच्या किल चित्रपटात दिसला.
अनुपमाची सुन आता बिग बॉस 19 चं घर गाजवणार? हे स्पर्धक होणार नव्या सिझनमध्ये सामील
साक्षीबद्दल बोलायचे झाले तर, ती एक अभिनेत्री आणि फिटनेस इन्फ्लुएंसर आहे. ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातील तिचे ‘बम डिग्गी डिग्गी’ हे गाणे देखील खूप लोकप्रिय झाले होते. २०२३ मध्ये तिने ‘ड्राय डे’ या चित्रपटात चुन्नीबाईची भूमिका साकारली होती.
राघवबद्दल बोलायचे झाले तर, कोरिओग्राफर म्हणून कारकिर्द सुरू केल्यानंतर, तो आता चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवत आहे. त्याने एबीसीडी २, नवाबजादे, स्ट्रीट डान्सर ३डी आणि किसी का भाई किसी की जान मध्ये काम केले आहे. राघव जुयाल तो शेवटचा २०२४ मध्ये ‘किल’ या चित्रपटामध्ये दिसला होता यामध्ये त्याने खलनायकाची भूमिका केली होती.