'जवान' दिग्दर्शकाचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान
टॉलिवूड दिग्दर्शक ॲटलीने आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ‘जवान’, ‘बेबी जॉन’सह अनेक सुपर डुपर हिट चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शकाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेलिब्रिटींना मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. काही शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ हा त्यांचा सन्मान करताना दिसत आहे. दक्षिणेकडील एका ख्यातनाम इन्स्टिट्यूटमधून अभिनेत्याचा सन्मान केला जाणार आहे.
‘मुंज्या’च्या यशानंतर सुहास जोशींचा ‘खोताची वाडी’मधील पहिला लूक चर्चेत!
बॉलिवूडसह टॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांकडून आणि विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. आता त्या यादीमध्ये दिग्दर्शक ॲटलीचेही नाव सामील झाले आहे. दिग्दर्शक ॲटलीला दक्षिणेकडील ख्यातनाम इन्स्टिट्यूट म्हणून समजल्या जाणाऱ्या ‘सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’तर्फे मानद डॉक्टरेटनं सन्मानित करण्यात येणार आहे. दिग्दर्शकाचा हा गौरव १४ जून रोजी चेन्नईमधील आयोजित एका कार्यक्रमात केला जाणार आहे. हा क्षण केवळ शैक्षणिक सन्मानापुरता मर्यादित नाही.
Atlee Kumar Get Docatarate Degree
राधा आणि पिंगा गर्ल्सना वेगळं करण्याचा भुतेंचा प्लॅन यशस्वी होईल का?
तर दिग्दर्शक ॲटलीच्या मूळ शिक्षण संस्थेसोबत पुन्हा एकदा सुदृढ नाते तयार करणारा आणि भावनांनी भरलेला क्षणही ठरणार आहे. तो त्याच्या संपूर्ण शैक्षणिक आयुष्याचा गौरवक्षण ठरेल हे नक्की. सत्यभामा विद्यापीठाचा हा सन्मान अॅटली यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान, त्याची नाविन्यपूर्ण मांडणी आणि व्यावसायिक चित्रपट अधिक आशयघन बनवण्याच्या प्रयत्नांना दिलेली मान्यता आहे. त्याच्या आयुष्याचा प्रवास एका कॉलेजच्या कॅम्पसमधून सुरु होऊन आंतरराष्ट्रीय ओळखीपर्यंत पोहोचलेला आहे. तसेच तो नव्या पिढीला स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देतो.
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊतने सांगितला किस्सा
दिग्दर्शक अॅटलीच्या फिल्मी करियरबद्दल बोलायचे तर, एका सामान्य विद्यार्थ्यानं मोठं स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवण्याचा केलेला प्रेरणादायी प्रवास आहे. ‘राजा राणी’पासून सुरू झालेली फिल्मी करियर ‘थेरी’, ‘मर्सल’, ‘बिगिल’ आणि देशभर गाजलेल्या ‘जवान’सारख्या चित्रपटांपर्यंत पोहोचलेला आहे. अॅटलीचं दिग्दर्शन केवळ भव्यदिव्य दृश्यांपुरतं मर्यादित नाही, तर ते कथानकात असलेली संवेदना, अॅक्शनमागचं भावविश्व आणि मनोरंजनातली आत्मिक गुंतवणूक देखील अधोरेखित करतं. सध्या अॅटली आगामी चित्रपट AA22 x A6 घेऊन नव्या सिनेमॅटिक विश्वाची रचना करत आहेत, ज्यात अल्लू अर्जुनसारखा सुपरस्टार आणि सन पिक्चर्ससारखा मोठा बॅनर सहभागी आहे.