नुकतंच 78th Cannes Film Festival मोठ्या थाटामाटात पार पडला. या फेस्टिव्हलमध्ये अनेक चित्रपटांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी भारताचे मिसाईल मॅन आणि स्वर्गीय माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली होती. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत करणार आहेत. सध्या सोशल मीडियासह सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. ‘कलाम: द मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ या चित्रपटाच्या माध्यमातून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटामध्ये ‘मिसाईल मॅन’ची भूमिका टॉलिवूड अभिनेता धनुष साकारणार आहे. अब्दुल कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषलाच का घेतलं? यावर दिग्दर्शकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागा चैतन्यचा छोटा भाऊ केव्हा अडकणार लग्नबंधनात? लग्नाची अपडेट्स आली समोर; वाचा सविस्तर…
देशाचे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन स्वर्गीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन ओम राऊत करणार आहेत. Cannes Film Festival मध्ये चित्रपटाच्या नावाचे उद्घाटन करण्यात आले जिथे दिग्दर्शकांनी या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टवर एक सविस्तर चर्चा केली. सोबतच, मुख्य भूमिकेसाठी त्यांनी धनुषचीच निवड का केली, या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. चित्रपटाविषयी बोलताना ओम राऊत म्हणाले की, “डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची भूमिका साकारताना, केवळ त्यांच्या कामगिरीचाच नाही तर त्यांचा आध्यात्मिक प्रवास आणि शैक्षणिक प्रवासही दाखवणे महत्त्वाचे होते. बायोपिकचा हा सर्वात आव्हानात्मक भाग आहे. या पात्राची अध्यात्म आणि बुद्धिमत्ता पडद्यावर आणण्यासाठी धनुषपेक्षा चांगला पर्याय दुसरा असूच शकत नाही, असं मला वाटतं. तो परिपूर्ण कलाकार आहे. माझ्या संपूर्ण टीमच्या वतीने, या महत्त्वाच्या प्रकल्पाचा भाग असल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो.”
मुलाखतीदरम्यान ओम राऊत यांनी मिसाईल मॅनबद्दल सांगितले की, “डॉ. कलाम यांचे विचार प्रत्येक तरुणाच्या मनात खोलवर रुतलेले आहेत. कॉलेजच्या काळात मी त्यांची ‘विंग्स ऑफ फायर’ हे त्यांचं पुस्तकही वाचलं होतं. प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर आज मी जे काही करतो आहे किंवा जे काही व्हायचं स्वप्न बघतो आहे त्याचं मूळ त्या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाने माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला आणि म्हणूनच मी आज इथे उभा आहे.” डॉ. कलाम यांच्यापासून प्रभावित होऊन त्यांचे विचार कसे आत्मसात केले याबद्दलही ओम राऊत यांनी सांगितले.
सुदेश म्हशिळकरांचं अकाउंट हॅक? सायबर क्राईमने दिली महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर
ओम राऊत यांनी चित्रपटासाठी निर्माते अभिषेक अग्रवाल यांची भेट कशी घेतली हे सांगितले. दिग्दर्शकांनी सांगितले की, निर्माता अभिषेक अग्रवाल यांनी माझ्यासोबत कल्पनेबद्दल संपर्क साधला. जेव्हा त्याने मला विचारले की मला रस आहे का, तेव्हा मी त्याला सांगितले की मी आधीच अशाच एका गोष्टीवर काम करत आहे. तो हैदराबादहून मुंबईत आला आणि आम्ही त्यावर सविस्तर चर्चा केली. नंतर, आम्ही टी-सीरीज आणि भूषण कुमार यांच्यासोबत सविस्तर चर्चा करुन चित्रपटाच्या सर्व गोष्टी फायनल केल्या.